T20 वर्ल्ड कपच्या वादात नवा ट्विस्ट, बांगलादेशच्या नव्या मागणीने ICC धक्क्यात!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी-20 वर्ल्ड कपमधले त्यांचे सामने भारतातून हलवून श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी मागणी आयसीसीकडे केली होती.
मुंबई : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी-20 वर्ल्ड कपमधले त्यांचे सामने भारतातून हलवून श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी मागणी आयसीसीकडे केली होती, पण आयसीसीने बांगलादेशची ही मागणी फेटाळून लावली आहे, त्यामुळे आता बांगलादेश टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. आता बांगलादेशऐवजी स्कॉटलंडची टीम टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळेल.
मागणी फेटाळून लावल्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या स्वतंत्र वाद निवारण समितीकडून हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे पत्र आयसीसीला लिहिलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम पाठवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आशा आहे की आयसीसी त्यांच्या पत्राला प्रतिसाद देईल आणि ठिकाण बदलण्याची मागणी वाद निवारण समितीकडे (डीआरसी) पाठवेल. आयसीसीच्या वाद निवारण समितीकडे स्वतंत्र वकिलांचा समावेश आहे. ही संस्था आयसीसीसोबत वाद सोडवणारी मध्यस्थ आहे, जी इंग्रजी कायद्यानुसार कार्यवाही करते, ज्याचं कामकाज लंडनमधून होतं.
advertisement
डीआरसी केवळ अपील मंच नाही तर ते आयसीसीच्या निर्णयांच्या कायदेशीरतेचे आणि अर्थाचे मूल्यांकन देखील करते. त्याचे निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहेत, मर्यादित प्रक्रियात्मक कारणांशिवाय अपील करण्याचा अधिकार नाही.
आयसीसीने बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आगामी आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे बांगलादेशचे सामने भारतातून हलवण्याची बीसीबीची विनंती नाकारली. बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी गुरुवारी पुष्टी केली की आयसीसीने त्यांची विनंती नाकारल्यानंतर, बांगलादेश त्यांचे वर्ल्ड कपचे सामने भारतात न खेळवण्याच्या निर्णयावर ठाम आहे.
advertisement
सध्याच्या वेळापत्रकानुसार, बांगलादेश 7 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापासून मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर लिटन दासच्या नेतृत्वाखालील बांगलादेशची टीम 9 फेब्रुवारी रोजी कोलकात्यामध्येच इटलीचा सामना करणार आहे आणि त्यानंतर कोलकाता येथेच पुन्हा बांगलादेश-इंग्लंडचा सामना होईल, त्यानंतर बांगलादेश मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नेपाळविरुद्ध खेळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 7:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपच्या वादात नवा ट्विस्ट, बांगलादेशच्या नव्या मागणीने ICC धक्क्यात!








