advertisement

IND vs PAK : जय शाहांनी टायमिंग साधलं, टॉसच्या 14 मिनिटं आधी केली सूचक पोस्ट!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्याआधी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सूचक पोस्ट केली आहे.

जय शाहांनी टायमिंग साधलं, टॉसच्या 14 मिनिटं आधी केली सूचक पोस्ट!
जय शाहांनी टायमिंग साधलं, टॉसच्या 14 मिनिटं आधी केली सूचक पोस्ट!
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा सामना होणार का नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलं होतं, पण आयसीसीने इशारा दिल्यानंतर पाकिस्तानने यूटर्न घेतला आणि मॅच खेळणार असल्याचं जाहीर केलं.
भारताविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आपण टॉस जिंकला असता तरी बॅटिंगच घेतली असती, अशी प्रतिक्रिया दिली. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही पहिले बॅटिंगकरून मॅच जिंकलो आहे, त्यामुळे आम्हाला यात कोणतेही बदल करायचे नव्हते, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement

जय शाहांची सूचक पोस्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या या सामन्याआधी आयसीसीचे प्रमुख जय शाह यांनी सूचक पोस्ट केली आहे. सामन्याचा टॉस पडण्याच्या 14 मिनिटं आधी जय शाह यांनी एक्सवर महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान शिवाची दिव्य ऊर्जा तुमचे जीवन शांती, समृद्धी आणि आनंदाने भरून टाको. ओम नमः शिवाय!', असं जय शाह म्हणाले आहेत.
advertisement
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांचं भारतीय टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर अर्शदीप सिंग आणि संजू सॅमसन यांना बाहेर बसावं लागलं आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी ही स्पिन बॉलिंगला मदत करते, त्यामुळे कुलदीप यादवला संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे अभिषेक शर्मा हा नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी अभिषेक शर्मा आजारी पडल्यामुळे खेळू शकला नव्हता.
advertisement
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : जय शाहांनी टायमिंग साधलं, टॉसच्या 14 मिनिटं आधी केली सूचक पोस्ट!
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement