BCCI चा कठोर निर्णय! स्पॉन्सशिवाय टीम इंडिया खेळणार Asia Cup, 'या' बड्या कंपन्यांना 'नो एन्ट्री'

Last Updated:

BCCI New Jersey Sponsor : आशिया कप 2025 जवळ आला असल्याने बीसीसीआयवर नवीन स्पॉन्सर शोधण्याचा दबाव वाढला आहे. मात्र, बीसीसीआयने कठोर निर्णय घेतला आहे.

Board of Control for Cricket in India
Board of Control for Cricket in India
BCCI New jersey sponsorship deal : केंद्र सरकारच्या ‘ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल’ या बिलमुळे बीसीसीआयला मोठा फटका बसल्याचं समोर आलं होतं. बीसीसीआयला ड्रिम इलेव्हन या ऑनलाईन गेमिंग कंपनीसोबतचा करार मोडीत काढावा लागला. अशातच आता बीसीसीआयला नव्या स्पॉन्सरची गरज आहे. आशिया कपमुळे स्पॉन्सरची गरज असताना बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

358 कोटी रुपयांचा करार

बीसीसीआय आता 2025 ते 2028 या कालावधीसाठी नव्या स्पॉन्सरची निवड करण्याच्या तयारीत आहे. ड्रीम 11 ने 2023 मध्ये बीसीसीआयसह जवळपास 358 कोटी रुपयांचा करार केला होता. आता टीम इंडियासोबत कोणती कंपनी जोडली जाणार? यावर चर्चा होताना दिसतीये. अशातच बीसीसीआयने काही कंपन्यांना नो एन्ट्री दिली आहे.
advertisement

काही कंपन्यांना नो एन्ट्री

मद्य, तंबाखू, जुगार, रियल मनी गेमिंग (फँट्सी स्पोर्ट्स गेमिंग सोडून), क्रिप्टोकरन्सी आणि पोर्नोग्राफीशी संलग्नित असलेल्या आणि सार्वजानिक नैतिकता न जपणाऱ्या कोणत्याही कंपनीला किंवा संस्थेला प्रायोजकत्व हक्क मिळवण्यासाठी अर्ज करता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन कंपनीचं नाव दिसणार आहे. तसेच यंदा स्पॉन्सरशीपसाठी मोठी डील होण्याची देखील शक्यता आहे.
advertisement

अर्ज करण्याची अखेरची तारीख किती? 

दरम्यान, संबंधित निविदा भरण्याची अखेरची तारीख 12 सप्टेंबर असून बोली लावण्याची अखेरची तारीख 16 सप्टेंबर असल्याचीही माहितीही देण्यात आलीये. त्यामुळे आशिया कपमध्ये टीम इंडिया स्पॉन्सरशिवाय खेळणार हे निश्चित झालंय. मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या संस्थांना पाच लाख रुपये आणि लागू होणारे वस्तू आणि सेवा कर (GST) भरावा लागेल. हे शुल्क परत न मिळणारे (non-refundable) आहे. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर लवकरच टीम इंडियासाठी नवीन मुख्य प्रायोजक कोण असेल, हे स्पष्ट होईल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI चा कठोर निर्णय! स्पॉन्सशिवाय टीम इंडिया खेळणार Asia Cup, 'या' बड्या कंपन्यांना 'नो एन्ट्री'
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement