Vaibhav Suryavanshi : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राडा! अंपायरसोबत वाद पण चर्चा मात्र 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीची, पाहा Video

Last Updated:

Vaibhav Suryavanshi Viral Video : नॉट आऊट दिल्यानंतरजितेश शर्मा याने अंपायरसोबत वाद घातला. त्याचवेळी वैभव सूर्यवंशी याची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली.

Vaibhav Suryavanshi Reaction Viral Video
Vaibhav Suryavanshi Reaction Viral Video
Vaibhav Suryavanshi Reaction Viral : पहिल्या सामन्यात जबरदस्त शतक झळकावल्यानंतर, युवा भारतीय क्रिकेट सेन्सेशन वैभव सूर्यवंशीने रविवारी आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये पाकिस्तानी गोलंदाजांना देखील फोडून काढलं. रविवारी रायझिंग आशिया कपमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागलाय. मात्र, निर्भयपणे पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवला, फक्त 28 चेंडूत पाच फोर आणि तीन सिक्ससह 45 धावा केल्या. अशातच या सामन्यात झालेल्या वादामुळे वैभव सूर्यवंशी पुन्हा चर्चेत आला.

अंपायरसोबत वाद घातला

कालच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू आऊट असताना देखील त्याला नॉटआऊट करार देण्यात आलं होतं. यानंतर कॅप्टन जितेश शर्माने अंपायरसोबत वाद घातला होता. त्यामुळे मैदानात मोठा राडा झाला होता. पाकिस्तान-ए संघाच्या डावातील १० वा ओव्हर सुयश शर्मा टाकत होता. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर माज सदाकतने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. नमन धीरने तो कॅच पूर्ण करताच भारतीय खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केली, कारण त्यांना वाटले की फलंदाज बाद झाला आहे.
advertisement
advertisement

वैभवची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद

भारतीय खेळाडूंनी अंपायरसोबत वाद घातल्यानंतर जितेश शर्मा याने वाद घातला. त्याचवेळी वैभव सूर्यवंशी याची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. 14 वर्षांच्या वैभवचा चेहरा पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. वैभवचा भोळाभाबळा चेहरा पाहून अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
पाकिस्तानविरुद्ध भारत अ (प्लेइंग इलेव्हन) : वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, सुयश शर्मा.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राडा! अंपायरसोबत वाद पण चर्चा मात्र 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीची, पाहा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement