Post Office Scheme: पत्नीच्या नावे खातं उघडा आणि 9,250 रुपयांचा महिन्याला रिटर्न मिळवा, काय आहे स्कीम?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना MIS मध्ये संयुक्त खाते उघडून १५ लाख गुंतवणुकीवर दरमहा ९२५० रुपये मिळतात. ७.४ टक्के व्याजदर आणि ५ वर्षांची मुदत आहे.
तुमची पत्नी तुम्हाला श्रीमंत करु शकते, आता तुम्ही म्हणाल कसं तर थांबा तुम्हाला सांगणार आहे, त्याआधी प्रत्येकाने आपल्या बायकोच्या नावाने जर असे पैसे बाजूला काढले तर दर महिन्याला जो काही फायदा होणार आहे ना तो कमाल असणार आहे. बायको तुम्हाला मालामाल करेल. आज आम्ही तुम्हाला पोस्टाची एक सीक्रेट स्कीम सांगणार आहोत. ज्यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला भलीमोठी रक्कम मिळू शकते.
advertisement
या स्कीममध्ये धोकाही कमी आणि फायदाही जास्त हे खातं तुम्ही पत्नीच्या नावे काढू शकता किंवा पती पत्नी दोघांच्याही नावे उघडू शकता. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ नियमित गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. सरकारी योजना, बॉन्ड आणि बँक ठेवी यासारखे पर्याय कमी धोका पत्करून निश्चित परतावा देतात. देशातील सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी पोस्ट ऑफिस अनेक आकर्षक बचत योजना चालवते.
advertisement
यापैकीच एक लोकप्रिय आणि उत्तम योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme - MIS). या योजनेत एकदाच मोठी रक्कम गुंतवावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला निश्चित व्याज मिळू लागते. सध्या पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेवर वार्षिक ७.४ टक्के इतका आकर्षक व्याजदर मिळत आहे. या मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत कमीत कमी १,००० रुपये इतकी गुंतवणूक करता येते.
advertisement
advertisement
एमआयएस (MIS) खात्याची मुदत ५ वर्षांची असते. या योजनेत तुम्ही एकदा रक्कम गुंतवल्यानंतर, दर महिन्याला निश्चित व्याजाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होत राहते. ५ वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर, एमआयएस खात्यात जमा केलेली मूळ रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खातंही उघडू शकता.
advertisement
जर तुम्ही आणि तुमच्या पत्नीने मिळून या योजनेत ४ लाख रुपये संयुक्त ठेव म्हणून जमा केले, तर तुम्हाला दरमहा २,४६७ रुपये इतका निश्चित व्याज मिळेल. तसेच, जर तुम्ही या योजनेत संयुक्त खात्याद्वारे कमाल १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर ७.४ टक्क्यांच्या वार्षिक व्याजदराने तुम्हाला दरमहा तब्बल ९,२५० रुपये मिळतील. जर एका व्यक्तीने ९ लाख रुपये गुंतवले, तर त्याचे मासिक उत्पन्न ५,५५० रुपये होईल.
advertisement
एमआयएस (MIS) योजनेत खाते उघडण्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. जर तुमचे बचत खाते नसेल, तर मासिक उत्पन्न योजनेचे खाते उघडण्यापूर्वी तुम्हाला बचत खाते उघडावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारद्वारे चालवले जात असल्यामुळे, या सर्व योजनांमध्ये सामान्य नागरिकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात, याची खात्री बाळगावी.


