IPL 2025 च्या सुरूवातीलाच Virat Kohli ची मोठी घोषणा, निवृत्तीची चर्चा सुरू असताना दिला 'जोर का झटका'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli On ODI World Cup 2027 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफलातून कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने मोठी घोषणा केली आहे. निवृत्तीची चर्चा सुरू असताना विराट आगामी वनडे वर्ल्ड कपवर मोठं वक्तव्य केलं.
Virat Kohli Refused Retirement : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं अन् विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला. कोहलीच्या नावावर चार आयसीसी ट्रॉफींचा लेबल जोडलं आहे. 2024 मध्ये विराटने टी-20 विश्वचषक जिंकला आणि गेल्या महिन्यात टीम इंडियाने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तर त्याआधी 2011 चा वनडे वर्ल्ड कप आणि 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील विराट कोहली टीम इंडियामध्ये होता. अशातच आता विराट कोहली निवृत्ती घेण्याची चर्चा होती होती. मात्र, किंग कोहलीने टीकाकारांना जोरदार उत्तर दिलं आहे.
निवृत्ती गेली खड्ड्यात... किंग खेळणार!
निवृत्ती गेली खड्ड्यात असा इशारा देत विराट कोहलीने निवृत्तीच्या चर्चांनावर फुल स्टॉप लावला आहे. आयपीएल सुरू असताना विराट कोहली एका कार्यक्रमात पोहोचला होता. त्यावेळी विराट कोहली याने बोलताना असं काही म्हटला की विराट कोहलीचे चाहते खुश झाले. विराटने यावेळी आपण 2027 चा वर्ल्ड कप खेळणार असल्याचं जाहीर केलं. त्याचा 15 सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
Question: Seeing In The Present, Any Hints About The Next Big Step?
Virat Kohli Said: The Next Big Step? I Don't Know. Maybe Try To Win The Next World Cup 2027. pic.twitter.com/aq6V9Xb7uU
— virat_kohli_18_club (@KohliSensation) April 1, 2025
विराट नेमकं काय म्हणाला?
advertisement
तु़झं पुढचं पाऊल काय असेल? असा सवाल प्रश्नोत्तराच्या फेरीत विराट कोहलीला विचारण्यात आला. त्यावेळी 'पुढची स्टेप माझी काय असेल? मला माहिती नाही, पण कदाचित पुढचा वर्ल्ड कप असेल', असं उत्तर विराट कोहलीने यावेळी दिलं. विराटच्या उत्तरानंतर चाहत्यांनी टाळ्या वाजवत त्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 01, 2025 2:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 च्या सुरूवातीलाच Virat Kohli ची मोठी घोषणा, निवृत्तीची चर्चा सुरू असताना दिला 'जोर का झटका'