Virat Rohit : विराट-रोहित 2026 मध्ये फक्त 18 दिवस खेळणार, टीम इंडियाच्या वनडे सीरिजचं शेड्यूल आताच नोट करा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2024 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर 2025 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यामुळे हे दोघंही आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळत आहेत.
मुंबई : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2024 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर 2025 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यामुळे हे दोघंही आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळत आहेत. विराट आणि रोहितने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे सीरिज आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी करत 2027 च्या वनडे वर्ल्ड कप खेळण्यावर दावा ठोकला आहे.
2026 च्या वर्षात विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाकडून सगळ्यात आधी न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज खेळतील. 11 जानेवारीपासून या सीरिजला सुरूवात होणार आहे. या वर्षभरात विराट आणि रोहित हे भारताकडून फक्त 18 सामने खेळणार आहेत. चाहत्यांना 365 दिवसांमध्ये फक्त 18 दिवस विराट-रोहितला भारताकडून खेळताना पाहता येणार आहे.
2026 मध्ये टीम इंडिया न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या दोन वनडे सीरिज होणार आहेत. प्रत्येक सीरिजमध्ये टीम इंडिया 3-3 वनडे खेळणार आहे.
advertisement
2026 मध्ये टीम इंडियाच्या वनडे
भारत विरुद्ध न्यूझीलंड (11, 14 आणि 18 जानेवारी)
भारत विरुद्ध अफगाणिस्तान- जून 2026
भारत विरुद्ध इंग्लंड (14, 16, 19 जुलै)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज- सप्टेंबर, ऑक्टोबर 2026
भारत विरुद्ध न्यूझीलंड- नोव्हेंबर 2026
भारत विरुद्ध श्रीलंका- डिसेंबर 2026
भारत-न्यूझीलंड सीरिज कधी?
भारत आणि न्यूझीलंड याच्यातल्या वनडे सीरिजला 11 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. यानंतर दुसरी वनडे 14 आणि तिसरी 18 जानेवारीला होईल. या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड 3 जानेवारीला होणार आहे.
advertisement
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. विराटने दक्षिण आफ्रिका आणि मग विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतकं ठोकली आहेत. तर दुसरीकडे रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये 2 अर्धशतकं आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी शतक ठोकलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 9:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Rohit : विराट-रोहित 2026 मध्ये फक्त 18 दिवस खेळणार, टीम इंडियाच्या वनडे सीरिजचं शेड्यूल आताच नोट करा!










