VHT 2026 : कोण आहे अमन राव? आकाश दीपला शेवटच्या बॉलवर सिक्स मारत पठ्ठ्यानं ठोकली डबल सेंच्युरी! अमेरिकेत जन्म झाला अन्...

Last Updated:

Who is Aman Rao : अमन रावने आपल्या केवळ तिसऱ्या लिस्ट ए मॅचमध्ये द्विशतकी धमाका केला आहे. डावाचा शेवटचा बॉल शिल्लक असताना अमन 194 रन्सवर खेळत होता.

Who is Aman Rao Smashes Iconic Six on Last Ball to Secure Double Century
Who is Aman Rao Smashes Iconic Six on Last Ball to Secure Double Century
Aman Rao Smashes Iconic Six on Last Ball : सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सहाव्या राऊंडनंतर हैदराबादचा एका युवा फलंदाजाने अफलातून खेळी करत डबल सेंच्युरी ठोकली. कुणालाही अपेक्षा नसताना या 21 वर्षाच्या पोराने मोहम्मद शमी, आकाश दीप, शाहबाज अहमद आणि मुकेश कुमार यांसारख्या बॉलर्सची धुलाई केली अन् मैदानात तांडव मांडला. 12 फोर आणि 13 सिक्सच्या मदतीने त्याने आक्रमक खेळी केली. अमेरिकेत जन्मलेला खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अमन राव आहे.

आयकॉनिक सिक्स मारला

अमन रावने आपल्या केवळ तिसऱ्या लिस्ट ए मॅचमध्ये द्विशतकी धमाका केला आहे. डावाचा शेवटचा बॉल शिल्लक असताना अमन 194 रन्सवर खेळत होता. समोर टीम इंडियाचा वेगवान बॉलर आकाश दीप होता, जो आपल्या अचूक बॉलिंगसाठी ओळखला जातो. मात्र, अमनने कोणताही दबाव न घेता आकाश दीपच्या त्या शेवटच्या बॉलवर एक आयकॉनिक सिक्स मारला आणि आपले पहिलं वहिलं डबल हंड्रेड पूर्ण केलं.
advertisement

200 रन्सची अविस्मरणीय खेळी

अवघ्या 154 बॉल्समध्ये अमनने नाबाद 200 रन्सची ही अविस्मरणीय खेळी साकारली. हैदराबादकडून खेळणाऱ्या या 21 वर्षीय खेळाडूच्या रूपाने क्रिकेटला एक भावी स्टार मिळाल्याचे बोलले जात आहे. शेवटच्या बॉलवर सिक्स मारून द्विशतक पूर्ण करण्याचा हा दुर्मिळ पराक्रम पाहून स्टेडियममधील चाहत्यांनी अमनला उभं राहून दाद दिली.
advertisement

15 वा भारतीय फलंदाज

अमन राव याने सुरुवातीचे 100 रन्स 108 बॉल्समध्ये पूर्ण केले होते, मात्र त्यानंतर त्याने गिअर बदलला आणि पुढचे 100 रन्स अवघ्या 46 बॉल्समध्ये कुटले. विशेष म्हणजे, आपल्या केवळ तिसऱ्या लिस्ट ए मॅचमध्ये त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याआधीच्या दोन मॅचेसमध्ये त्याने केवळ 13 आणि 39 रन्स केले होते, पण या मॅचमध्ये त्याने थेट डबल हंड्रेड ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या खेळीसह अमन लिस्ट ए फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा 15 वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
advertisement

दुर्मिळ किमया साधली

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये असा पराक्रम करणारा तो दुसरा फलंदाज आहे. त्याच्याआधी ओडिशाच्या स्वास्तिक समाल याने 212 रन्सची खेळी केली होती. स्वास्तिकप्रमाणेच अमननेही लिस्ट ए क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच शतकाचे रूपांतर द्विशतकात करण्याची दुर्मिळ किमया साधली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VHT 2026 : कोण आहे अमन राव? आकाश दीपला शेवटच्या बॉलवर सिक्स मारत पठ्ठ्यानं ठोकली डबल सेंच्युरी! अमेरिकेत जन्म झाला अन्...
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement