IPL : विराटसोबत पंगा घेणारा होणार KKR चा कोच! अजिंक्य रहाणेची कॅप्टन्सीही धोक्यात
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 सुरू व्हायला अजून 5 महिने शिल्लक आहेत, पण त्याआधीच टीमकडून तयारीला सुरूवात झाली आहे. शाहरुख खानच्या मालकीची केकेआर नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
मुंबई : टीम इंडियाचा महान स्पिनर अनिल कुंबळे त्याचा 55वा वाढदिवस साजरा करत आहे. कुंबळेच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, पण एका शुभेच्छेमुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या शुभेच्छा आयपीएलची टीम कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या आहेत.
अनिल कुंबळेच्या वाढदिवसानिमित्त केकेआरने त्याचे फोटो शेअर केले आहेत. एक माणूस, बऱ्याच भूमिका, असं कॅप्शन केकेआरने या पोस्टला दिलं आहे. केकेआरच्या या पोस्टनंतर चाहते कुंबळे केकेआरचा पुढचा प्रशिक्षक होणार का? असा प्रश्न विचारत आहेत.
केकेआर प्रशिक्षकाच्या शोधात
आयपीएल 2026 आधी केकेआर प्रशिक्षकाच्या शोधात आहे, कारण टीमचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी याचवर्षी जुलै महिन्यात केकेआरचं प्रशिक्षकपद सोडलं होतं. तर कुंबळेला याआधीही आयपीएल टीमच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. कुंबळे हा पंजाब किंग्सचा प्रशिक्षही होता. सध्या कुंबळे कोणत्याही टीमचा प्रशिक्षक नाही, त्यामुळे कुंबळे केकेआरचा कोच होण्याची शक्यता आहे.
advertisement
#AjKerAdda: What other abilities describe @anilkumble1074 the best? https://t.co/1IK6QNhXnE
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 17, 2025
विराटसोबत कुंबळेचे वाद
अनिल कुंबळे 2016 साली टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला होता. कुंबळे कोच असताना टीम इंडियाने बरंच यश मिळवलं, पण 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर कर्णधार विराट कोहलीचे कुंबळेसोबत वाद झाले, त्यानंतर कुंबळेने टीमचं प्रशिक्षकपद सोडलं आणि मग रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षक झाले.
advertisement
केकेआर कर्णधारही बदलणार?
आयपीएलच्या मागच्या मोसमात केकेआरची कामगिरी फारच निराशाजनक झाली. 14 सामन्यांमध्ये केकेआरला फक्त 5 मॅच जिंकता आल्या, तर 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या 2 मॅच पावसामुळे रद्द झाल्या. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर आठव्या क्रमांकावर राहिली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरने आयपीएलचा मागचा सिझन खेळला, पण यंदा केकेआर टीमचा कर्णधार बदलणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत. आयपीएल 2026 साठीचा लिलाव 15 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे, त्याआधी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व टीमना रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. ही यादी समोर आल्यानंतरच केकेआर कोणाला टीममध्ये कायम ठेवणार आणि कोणाला डच्चू देणार? हे स्पष्ट होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 9:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL : विराटसोबत पंगा घेणारा होणार KKR चा कोच! अजिंक्य रहाणेची कॅप्टन्सीही धोक्यात