Vaibhav Sooryavanshi : बोर्डाच्या पेपरला दांडी मारून वैभवने कुठं काढला पळ? मुख्याध्यापकांनी झापल्यानंतर समोर आला Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rajasthan Royals Share Vaibhav Sooryavanshi Video : राजस्थान रॉयल्सने आपल्या लाडक्या खेळाडूचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो मजा मस्ती करताना दिसतोय.
Vaibhav Sooryavanshi skipped 10th board exam : टीम इंडियाचा युवा सेन्सेशन असलेल्या वैभव सूर्यवंशी याने अफलातून कामगिरीचं प्रदर्शन करत अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्यामुळे त्याचं पंतप्रधान मोदींनी देखील कौतुक केलं होतं. अशातच आता वैभवचा यावर्षी सीबीएसई (CBSE) 10 वीची बोर्ड परीक्षा असल्याने तो आयपीएल खेळेल का? असा सवाल विचारला जात होता. मात्र, वैभवच्या पालकांनी विचित्र निर्णय घेतला अन् सर्वांना धक्का दिला. वैभव यंदाच्या वर्षी 10 वीची परीक्षा देणार नसल्याचं समजतंय. पेपरला दांडी मारून वैभव कुठं गेलाय? याचा व्हिडीओ समोर आलाय.
पेपरला दांडी मारून वैभव राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये
वैभव यंदाच्या वर्षी 10 चा पेपर देणार नसल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलं होतं. बिहारमधील ताजपूरचा रहिवासी असलेला वैभव सुर्यवंशी सध्या ट्रेनिंग, सराव शिबिरे आणि विविध क्रिकेट टूर्नामेंट्समध्ये प्रचंड व्यस्त असल्यानं वैभवने हा कठीण निर्णय घेतल्याचं समजतंय. अशातच आता पेपरला दांडी मारून वैभव राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये मस्ती करताना दिसतोय. त्याचा एक व्हिडीओ राजस्थानने शेअर केला आहे.
advertisement
advertisement
अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही
वैभव सूर्यवंशी ताजपूरमधील मॉडेस्टी स्कूलचा विद्यार्थी असून 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी त्याचे फॉर्म भरले गेले होते. अगदी त्याचे ॲडमिट कार्ड देखील प्रसिद्ध झाले होते आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. मात्र, सततच्या क्रिकेट मॅचेस आणि प्रवासामुळे त्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षीची बोर्ड परीक्षा न देण्याचा निर्णय वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी आणि शाळा प्रशासनाने चर्चेनंतर घेतला आहे.
advertisement
advertisement
वैभवची वर्षभरातील कामगिरी
दरम्यान, अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ मध्ये टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात वैभवचा मोलाचा वाटा होता. या स्पर्धेत त्याने ७ मॅचेसमध्ये ६२.७१ च्या सरासरीने ४३९ रन्स कुटले होते, ज्यामध्ये इंग्लंडविरुद्ध फायनलमध्ये त्याने ठोकलेल्या १७५ रन्सचाही समावेश आहे. त्याच्या या तुफानी कामगिरीमुळे आणि १६९.४९ च्या स्ट्राईक रेटमुळे तो स्पर्धेत सर्वाधिक रन्स बनवणारा दुसरा खेळाडू ठरला. या छोट्या वयात त्याने क्रिकेटच्या पिचवर अनेक मोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 12:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Sooryavanshi : बोर्डाच्या पेपरला दांडी मारून वैभवने कुठं काढला पळ? मुख्याध्यापकांनी झापल्यानंतर समोर आला Video










