Smriti Mandhana : भारतीयांचं हृदय तुटलं, स्मृतीला पाहून आठवला सचिन, इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
29 वर्षांनंतर स्मृती मंधानाकडे पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा सचिनची आठवण झाली, कारण भारतीयांनी पुन्हा एकदा हार्टब्रेक पाहिला आणि इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला.
इंदूर : 1990 चा तो काळ, कोट्यवधी भारतीयांच्या आशा फक्त एका नावावर खिळून असायच्या. सचिन तेंडुलकर मैदानात असेल तर भारत सामना जिंकणार, असा विश्वास चाहत्यांच्या डोळ्यात दिसायचा, पण काही वेळा चाहत्यांचं हार्टब्रेकही व्हायचं. 1996 चा वर्ल्ड कप, इडन गार्डनचं मैदान आणि श्रीलंकेविरुद्धची सेमी फायनल कोणताच भारतीय क्रिकेट रसिक विसरू शकणार नाही. सचिनची विकेट गेली आणि टीम इंडियाची बॅटिंग गडगडली. संतापलेल्या प्रेक्षकांनी इडन गार्डन मैदानाला आग लावली, त्यानंतर सामना श्रीलंकेने जिंकला.
29 वर्षांनंतर स्मृती मंधानाकडे पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा सचिनची आठवण झाली, कारण भारतीयांनी पुन्हा एकदा हार्टब्रेक पाहिला आणि इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला. महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया जिंकेल असं वाटत होतं, पण स्मृती मंधानाची विकेट गेली आणि भारताने हातातला सामना गमावला. शेवटच्या 10 ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 62 रनची गरज होती आणि हातात 7 विकेट होत्या, पण स्मृती मंधानाची विकेट गेली आणि टीम इंडियाची बॅटिंग गडगडली.
advertisement
इंग्लंडने दिलेल्या 289 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मंधानाने 88 रनची खेळी केली, पण स्मृतीची विकेट गेल्यानंतर बॅटिंग रुळावरून घसरली आणि टीम इंडियाचा 4 रनने पराभव झाला. स्मृती आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात 125 रनची पार्टनरशीप झाली, हरमनप्रीतने 70 बॉलमध्ये 70 रन केले, पण हरमनप्रीतही मोक्याच्या क्षणी आऊट झाली. या पराभवानंतर स्मृती मंधानाला अश्रू अनावर झाले.
advertisement
टीम इंडिया अडचणीत
यंदाच्या महिला वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा हा लागोपाठ तिसरा पराभव आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर आता इंग्लंडनेही टीम इंडियाला पराभूत केलं आहे. याचसोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या टीम सेमी फायनलला पोहोचल्या आहेत. आता सेमी फायनलच्या चौथ्या स्थानासाठी भारत आणि न्यूझीलंडमध्ये स्पर्धा आहे. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला न्यूझीलंड आणि बांगलादेशचा पराभव करावा लागणार आहे, यानंतरही भारतीय टीमला इतर निकालांवर अवलंबून राहावं लागेल.
view commentsLocation :
Indore,Madhya Pradesh
First Published :
October 19, 2025 11:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : भारतीयांचं हृदय तुटलं, स्मृतीला पाहून आठवला सचिन, इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला!











