Success Story: 9 वी पास आदिवासी महिलेनं उभी केली 3.50 कोटींची कंपनी, पीएम मोदींनी केला सन्मान

Last Updated:

रुक्मिणी कटारा, नरेगा मजुर ते दुर्गा सोलर कंपनीच्या सीईओपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. तिने आदिवासी महिलांना रोजगार दिला आणि २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी तिचा सन्मान केला.

News18
News18
कधीकाळी नरेगाच्या मजुरीवर घर चालवणारी रुक्मिणी आज स्वतःच्या कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. हो, दुर्गा सोलर कंपनी, डूंगरपूर रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या सौरऊर्जेच्या कंपनीचा तिने हळूहळू, पण खंबीर पावले टाकत एक मजबूत पाया घातला आहे. तिच्या नेतृत्वाखाली आज 50 महिलांची एक ऊर्जा ती झाली आहे. त्यांना रोजगार देण्याचं काम तिने केलं आहे. सेना सोलर प्लेट, बल्ब आणि विविध उपकरणांचं उत्पादन करत आहे.
ही महिला आहे डूंगरपूर जिल्ह्यातलं माडवा खापरडा हे छोट्याशा गावातली. राजस्थानच्या या आदिवासी पट्ट्यात त्याट मातीतून एक सर्वसामान्य महिलांसाठी एक प्रेरणास्थान निर्माण करणाऱ्या रुक्मिणी कटारा यांच्या संघर्षाची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे.
नरेगात मजुरी करताना एक दिवस तिला राजीविका या संस्थेबाबत माहिती मिळाली. इथेच तिच्या आयुष्याची दिशा बदलली. तिने स्वयंसहायता गटात सामील होऊन सोलर लँप बनवायला शिकली. सोलर प्लेट तयार करणं, त्याची इन्स्टॉलेशन… हे सर्व कौशल्य तिने आत्मसात केलं. मग ती दुर्गा सोलर कंपनीत पर्यवेक्षिका म्हणून रुजू झाली.
advertisement
हळूहळू तिच्या कामगिरीतली चमक ओळखली गेली. एकेक पायरी चढत ती कंपनीची सीईओ बनली. आज तिच्या हातात केवळ कंपनीचं संचालन नाही, तर संपूर्ण आदिवासी भागातील महिलांच्या आशेचा किरण दाखवला आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीने 3.5 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल केली आहे. ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, तर एका स्त्रीच्या धैर्याची आणि संघर्षाची कहाणी आहे.
advertisement
२०१६ मध्ये रुक्मिणी कटाराला दिल्लीतील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. त्या दिवशी तिने हसत हसत एक वाक्य म्हटलं होतं – “महिलांनी कधीही शिक्षण कमी आहे म्हणून स्वतःला थांबवू नये. कमी शिकूनही मोठं होता येतं.” रुक्मिणीचं कुटुंबही तितकंच समृद्ध. पती कमलेश आणि चार मुले, तीन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. मोठा मुलगा राकेश आणि मुलगी आशा बी.एड. करत आहेत. प्रवीण आणि युवराज अजून कॉलेजमध्ये आहेत.
advertisement
रुक्मिणी फक्त CEO नाही, ती एक प्रेरणा आहे – विशेषतः आदिवासी महिलांसाठी. ती म्हणते, "मी फक्त नववी शिकले. पण आज एका कंपनीची मालक आहे. मग इतर महिलाही हे का नाही करू शकत?" तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आहे आणि आवाजात दुसऱ्यांना उभं करण्याची ताकद. काही माणसं फक्त स्वतःचं नशीब बदलत नाहीत, तर आपल्या भोवतालचं जगही बदलून टाकतात समृद्ध करतात. रुक्मिणी कटारा ही त्यापैकीच एक तेजस्वी उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: 9 वी पास आदिवासी महिलेनं उभी केली 3.50 कोटींची कंपनी, पीएम मोदींनी केला सन्मान
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement