Success Story: 4 रुपयांवर केली मजूरी; इंजिनिअर्सना चहा पाजून शिकला काम; आज आहे कोट्यधीश!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
कामराज हे पूर्णपणे अशिक्षित असूनही आज 'राज फॅन' कंपनीचे मालक आहेत. एकेकाळी रोज केवळ 4 रुपये मजुरीवर काम करणारे कामराज यांनी मेहनत, जिद्द...
Success Story: खरंतर ही गोष्ट आहे कामराज यांच्या जिद्द, कष्ट आणि संघर्षाची. कामराज आज एका कंपनीचे मालक आहेत आणि त्यांच्या कारखान्यात बनवलेले 'राज फॅन' बाजारात धुमाकूळ घालत आहेत. विशेष म्हणजे, कामराज पूर्णपणे निरक्षर आहेत. त्यांना लिहिता-वाचता येत नसलं तरी, त्यांना एक गोष्ट माहीत होती की, यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर संघर्ष करावाच लागेल. मग काय, एकेकाळी रोज 4 रुपये कमवणारे कामराज, आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी पाहिलेलं यशाचं स्वप्न पूर्ण केलं.
...अशी केली व्यवसायाची सुरूवात
कामराज यांनी सांगितलं की, त्यांचे वडील शेतकरी होते आणि घराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी गांधी सेतूच्या बांधकामात मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली, जिथे त्यांना दिवसाला 4 रुपये मिळायचे. ते पुलाचं बांधकाम करणाऱ्या गेमन इंडिया कंपनीच्या इंजिनिअर्सना चहाही द्यायचे. त्या बदल्यात इंजिनिअर्स त्यांना विजेबद्दलच्या बारीक गोष्टी शिकवायचे. हळूहळू कामराज विजेचं काम शिकले. याच दरम्यान, ते 11 वर्षांसाठी घरापासून दूर मजुरीसाठी गेले आणि जेव्हा त्यांना विजेचं काम पूर्णपणे आलं, तेव्हा त्यांनी पंखा दुरुस्त करण्याचं एक छोटं दुकान उघडलं. त्यातून थोडे थोडे पैसे वाचवून त्यांनी पंखे बनवण्याचा कारखाना सुरू केला. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी कर्जही घेतलं. कामराज यांचा कारखान वैशाली जिल्ह्यात आहे.
advertisement
कामराज यांनी सर केलं यशाचं शिखर
आज कामराज यांच्या कारखान्यात डझनभर लोक काम करतात आणि इथे तयार होणारा 'राज फॅन' बाजारात आपली छाप पाडत आहे. कामराज यांनी सांगितलं की, तीन वर्षांपूर्वीपर्यंत कंपनीत गुंतवलेला सर्व पैसा त्यांची स्वतःची कष्टाची कमाई होती. पण तीन वर्षांपूर्वी त्यांनी बँकेकडून 35 लाख रुपयांचं कर्ज घेतलं, त्यानंतर त्यांनी कंपनीचा विस्तार केला जेणेकरून जास्तीत जास्त पंखे तयार करता येतील. आज कामराज एक चांगले व्यापारी असण्यासोबतच एक उत्तम पालकही आहेत. त्यांना स्वतःला शिक्षण घेता आलं नाही, पण त्यांनी आपल्या तीन मुलांना चांगलं शिक्षण दिलं, जे आज चांगल्या नोकऱ्या करून स्थायिक झाले आहेत.
advertisement
हे ही वाचा : Farmer Success Story: नोकरी सोडली, तरुण करतोय आता गावरान अंड्यांची विक्री, महिन्याला होते इतकी कमाई, Video
हे ही वाचा : Success Story: बिझनेस करायचा, धाडस दाखवून सोडली नोकरी, आता मालक होऊन कमावतो 10 लाख रुपये!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 27, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: 4 रुपयांवर केली मजूरी; इंजिनिअर्सना चहा पाजून शिकला काम; आज आहे कोट्यधीश!