Success Story: बिझनेस करायचा, धाडस दाखवून सोडली नोकरी, आता मालक होऊन कमावतो 10 लाख रुपये!

Last Updated:

सुरुवातीपासूनच त्यांना व्यवसायाची विशेष आवड होती. घरामध्ये कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसतानाही, त्यांनी एक वेगळी दिशा निवडण्याचं धाडस केलं.

+
News18

News18

बीड: बीड जिल्ह्यातील वडवणी येथील करण राठोड या तरुणाने आपल्या जिद्दीतून आणि मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठलं आहे. पुण्यात एका खाजगी कंपनीत तीन ते चार वर्षे सलग तीस हजार रुपयांवर नोकरी करून करण राठोड यांनी आर्थिक स्थैर्य मिळवलं होतं. मात्र सुरुवातीपासूनच त्यांना व्यवसायाची विशेष आवड होती. घरामध्ये कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसतानाही, त्यांनी एक वेगळी दिशा निवडण्याचं धाडस केलं.
नोकरी करत असतानाच त्यांनी काही पैसे साठवून ठेवली आणि उरलेल्या पैशांसाठी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांकडून देखील व्यवसाय सुरू करण्यास विरोध होता, कारण कुणीही पूर्वी व्यवसाय केलाच नव्हता. तरीही करण राठोड यांनी नोकरी सोडण्याचं धाडस दाखवलं आणि स्वप्न उराशी बाळगत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांना वाटत होतं की, व्यवसायात काही तरी नवीन करून दाखवायचं आहे.
advertisement
व्यवसायाच्या सुरुवातीचे आठ ते नऊ महिने खूप कठीण गेले. अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही आणि नुकसान सहन करावं लागलं. मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांच्यातील चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत यांमुळे त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि व्यवसायात हळूहळू प्रगती केली. त्यांनी निवडलेला फोटोग्राफी क्षेत्रातला मार्ग थोडा वेगळा होता, पण त्यांनी त्यामध्ये नाव मिळवलं.
advertisement
आज करण राठोड यांचा फोटोग्राफी व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो आहे. विशेष म्हणजे, जेव्हा अनेक तरुण नोकरीसाठी धडपडत आहेत, तेव्हा करण यांनी इतरांना रोजगार देण्याचं काम केलं आहे. सध्या त्यांच्या स्टुडिओमध्ये 5 ते 6 युवक चांगल्या पगारावर काम करत आहेत. ग्राहकांना दिलेल्या उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार कामामुळे  ते या व्यवसायाच्या माध्यमातून प्रतिवर्षी कमीत कमी 10 लाखांपर्यंत नफा मिळवतात.
advertisement
वडवणीसारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या करण राठोड यांची ही यशोगाथा नवोदित तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. जिथे परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि कुटुंबाचा विरोध या सर्व गोष्टी आड येत असतात, तिथे त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला. त्यांचं यश हे स्पष्ट दाखवतं की इच्छाशक्ती आणि कष्टांची तयारी असेल तर कोणतंही स्वप्न सत्यात उतरवता येतं.
मराठी बातम्या/मनी/
Success Story: बिझनेस करायचा, धाडस दाखवून सोडली नोकरी, आता मालक होऊन कमावतो 10 लाख रुपये!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement