19 Minute Viral Video नंतर लिक झाला College MMS, डिजिटल जग कसा ठरतो इतका धोकादायक? वाचा सविस्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जे केवळ एका खाजगी आठवणीसाठी रेकॉर्ड केले होते, ते आता इंटरनेटच्या महाजाळ्यात लाखो लोकांच्या नजरेत पडले आहे. हे प्रकरण केवळ एका चुकीचं नाही, तर संपूर्ण तरुणाईसाठी एक धोक्याची घंटा आहे.
मुंबई : आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग झाला आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक खास क्षण, आठवण कॅमेऱ्यात कैद करतो. पण कधी विचार केलाय का? हीच डिजिटल आठवण कधीतरी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते. सध्या देशातील एका नामवंत कॉलेजमधील दोन तरुण-तरुणींच्या 'प्रायव्हेट' व्हिडिओ लीक प्रकरणाने पुन्हा एकदा सोशल मीडियावरील भयानक वास्तवाचा चेहरा समोर आणला आहे. जे केवळ एका खाजगी आठवणीसाठी रेकॉर्ड केले होते, ते आता इंटरनेटच्या महाजाळ्यात लाखो लोकांच्या नजरेत पडले आहे. हे प्रकरण केवळ एका चुकीचं नाही, तर संपूर्ण तरुणाईसाठी एक धोक्याची घंटा आहे.
खाजगी आठवणीपासून ते मानसिक छळापर्यंतचा प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात एका कॉलेजमधील जोडप्याच्या खाजगी क्षणांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगपासून झाली. त्यांचा हेतू हा व्हिडिओ कोणालाही दाखवण्याचा नव्हता. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या तरी मार्गाने कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये पोहोचला आणि तिथून प्राइवेसीचे धिंडवडे निघाले.
काही तासांतच हा व्हिडिओ 'X' (ट्विटर), इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर वणव्यासारखा पसरला. या व्हिडिओवर केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट्स आणि कॅप्शन्सनी या आगीत तेल ओतण्याचे काम केले. जेव्हा त्या मुलीला कॉलेजमध्ये लोकांच्या नजरा, विचित्र हास्य आणि अनोळखी नंबरवरून येणारे धमक्यांचे मेसेजेस येऊ लागले, तेव्हा तिला या भयानक प्रकाराची जाणीव झाली.
advertisement
डिजिटल तज्ज्ञांच्या मते, एखादी व्यक्ती स्वतःहून व्हिडिओ शेअर करणे आणि तिच्या संमतीशिवाय (Non-consensual) तो लीक होणे, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. संमतीशिवाय पसरलेला कंटेंट हा केवळ गुन्हा नाही, तर तो पीडितेच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारा ओरखडा उमटवतो. यामुळे गंभीर ताण, नैराश्य (Depression) आणि काही प्रसंगी टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता निर्माण होते.
advertisement
इंटरनेटवरून कंटेंट हटवणे का कठीण आहे?
एकदा का एखादा व्हिडिओ इंटरनेटवर 'पब्लिक' झाला की, तो पूर्णपणे काढून टाकणे जवळजवळ अशक्य असते. 'मिरर लिंक्स'च्या माध्यमातून हा कंटेंट पुन्हा पुन्हा अपलोड केला जातो. टेलिग्रामसारखी एनक्रिप्टेड ॲप्स अशा कंटेंटला पसरवण्यासाठी खतपाणी घालतात. तांत्रिक भाषेत याला 'डिजिटल फूटप्रिंट' म्हणतात, जो कधीही पुसता येत नाही.
कशी घ्याल काळजी?
अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक तरुणाने खालील गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे:
advertisement
-खाजगी क्षण रेकॉर्ड करणे टाळा: तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवणे धोकादायक आहे. फोन चोरीला जाणे किंवा क्लाउड हॅकिंगमुळे डेटा लीक होऊ शकतो.
-क्लाउड सिंकिंग तपासा: अनेकदा तुमचे खाजगी फोटो आपोआप 'Google Photos' किंवा 'iCloud' वर सिंक होतात. तुमचे पासवर्ड स्ट्रॉन्ग ठेवा आणि टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2FA) ऑन ठेवा.
-अनोळखी लिंकवर क्लिक करू नका: फिशिंग लिंक्सच्या माध्यमातून तुमचा गॅलरीचा एक्सेस चोरला जाऊ शकतो.
advertisement
- प्रेमसंबंधात असताना काढलेले फोटो किंवा व्हिडिओ ब्रेकअपनंतर शस्त्र म्हणून वापरले जाण्याची भीती असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच सतर्क राहा.
-कायद्याची मदत घ्या: आयटी कायद्याच्या कलम 66E आणि 67 नुसार, कोणाचीही खाजगी प्रतिमा किंवा व्हिडिओ संमतीशिवाय पसरवणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
तुमचा एक चुकीचा निर्णय किंवा थोडीशी लापरवाही तुमचे करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. डिजिटल दुनिया जितकी सोयीस्कर आहे, तितकीच ती क्रूरही असू शकते. त्यामुळे 'स्मार्टफोन' वापरताना 'स्मार्ट' राहा आणि आपल्या प्राइवेसीची जबाबदारी स्वतः घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
19 Minute Viral Video नंतर लिक झाला College MMS, डिजिटल जग कसा ठरतो इतका धोकादायक? वाचा सविस्तर








