साऊथ सुपरस्टारवर कोसळला दुःखाचा डोंगर! प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक, 10 वर्षांपासून सुरू होती मृत्यूशी झुंज
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
मल्याळम चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मोहनलाल यांच्या मातोश्री शांता कुमारी यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ३० डिसेंबर रोजी कोच्ची येथील मोहनलाल यांच्या राहत्या घरी ही दुःखद घटना घडली.
मुंबई: मल्याळम चित्रपटसृष्टीचे दिग्गज आणि पॅन इंडिया सुपरस्टार मोहनलाल यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी ठरला आहे. त्यांच्या मातोश्री शांता कुमारी यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ३० डिसेंबर रोजी कोच्ची येथील मोहनलाल यांच्या राहत्या घरी ही दुःखद घटना घडली. गेल्या काही वर्षांपासून त्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या, पण अखेर ही झुंज संपली.
१० वर्षांचा प्रदीर्घ लढा अखेर अयशस्वी
शांता कुमारी या गेल्या १० वर्षांपासून अर्धांगवायू (Paralysis) आणि मज्जासंस्थेशी संबंधित (Neurological illness) आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर अमृता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उतारवयामुळे आणि वाढत्या व्याधींमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. अखेर कोचीमधील इलमक्कारा येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या लाडक्या आईच्या निधनामुळे मोहनलाल यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement

मोहनलाल आणि त्यांच्या आईचं नातं हे केवळ माय-लेकाचं नव्हतं, तर ते एकमेकांचे आधारस्तंभ होते. एका जुन्या मुलाखतीत शांता कुमारी यांनी सांगितलं होतं की, मोहनलाल लहानपणी जसा घरी मस्ती करायचा, अगदी तसाच अभिनय तो सुरुवातीच्या काळात पडद्यावर करायचा. आपल्या मुलाला सुपरस्टार होताना त्यांना आपल्या डोळ्यादेखत पाहिलं.
advertisement
advertisement
२००० मध्ये मोठा भाऊ प्यारेलाल आणि त्याआधी वडिलांच्या निधनानंतर मोहनलाल यांनी आपल्या आईची मनोभावे सेवा केली. मोहनलाल यांनी सुरू केलेली 'विश्वशांती फाउंडेशन' ही सामाजिक संस्था त्यांच्या आई-वडिलांच्या नावावरच आहे. काही काळापूर्वीच शांता कुमारी यांनी व्हीलचेअरवर बसून आपला वाढदिवस साजरा केला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
advertisement
पत्नी सुचित्रा यांची खंबीर साथ
मोहनलाल कामाच्या निमित्ताने बाहेर असले की, त्यांच्या पत्नी सुचित्रा या आईची सावली बनून त्यांच्यासोबत असायच्या. वडिलांच्या जाण्यानंतर मोहनलाल यांनी आईला कधीही एकटेपणा जाणवू दिला नाही. मोहनलाल अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आईला द्यायचे. अशातच, आज त्यांच्या आईच्या निधनानंतर चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
साऊथ सुपरस्टारवर कोसळला दुःखाचा डोंगर! प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक, 10 वर्षांपासून सुरू होती मृत्यूशी झुंज










