advertisement

Google गुपचूप ऐकतोय तुमचं बोलणं! एका ट्रिकने बंद करता येईल हेरगिरी

Last Updated:

गुगल तुमची वेब अँड अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीने ऑडियो रेकॉर्डिंग्स कलेक्ट करत असतो. गुगल म्हणते की, ते यूझरची व्हॉइस कमांड्स चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी असे करते. 

गुगल प्रायव्हसी सेटिंग
गुगल प्रायव्हसी सेटिंग
नवी दिल्ली : गुगल आपल्या यूझर्सला अनेक सुविधा  देते. पण या फीचर्समध्ये काही 'हिडन' सेटिंग्सही असता. ज्या आपल्या प्रायव्हसीसाठी धोका बनू शकतात. आपल्या गुगल अकाउंटमध्ये एक असं फीचर उपलब्ध आहे. जे आपल्या गुपचूप नजर ठेवत असते. हे फीचर आपल्या वेब अँड अॅप अॅक्टिव्हिटीने ऑडियो रेकॉर्डिंग्स कलेक्ट करत असते. एक प्रकारे गुगल हे तुमचं बोलणंही एकतं. गूगलचा तर्क आहे की, ते केवळ तुमची व्हॉइस कमांड्स चांगल्या बनवणे आणि मार्केटिंग प्रयत्न योग्य करण्यासाठी असं करते. खरंतर, तंत्रज्ञ मानतात की, हे यूझर्सच्या प्रायव्हसीचे थेट उल्लंघन आहे. कारण जास्तीत जास्त लोकांना याविषयी माहिती नसते.
याहूनही मोठा धोका म्हणजे जर एखाद्या सायबर गुन्हेगाराने तुमचे गुगल अकाउंट किंवा स्मार्ट डिव्हाइस हॅक केले तर ते तुमच्या सर्व व्हॉइस डेटामध्ये प्रवेश मिळवू शकतात, ज्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच, गुगलची "हेरगिरी" कशी थांबवायची आणि तुमची प्रायव्हसी कशी सुरक्षित करायची हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. सुदैवाने, गुगल त्याच्या यूझर्सना हा डेटा नियंत्रित करण्याची परवानगी देते. तुम्ही तुमच्या "डेटा अँड प्रायव्हसी" सेटिंग्जमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग बंद करू शकता.
advertisement
व्हॉइस अँड ऑडियो अ‍ॅक्टिव्हिटी कशी करावी ऑफ
  • सर्वात आधी आपल्या अँड्रॉइड फोन किंवा टॅबलेटमध्ये सेटिंग्स अ‍ॅप ओपन करा नंतर गुगलवर जा.
  • यानंतर Manage your Google account वर क्लिक करा.
  • नंतर Data & privacy वर जा.
  • यानंतर History settings च्या आत  Web & App Activity वर टॅप करा.
  • नंतर Include voice and audio activity बॉक्स अनचेक करा.
advertisement
ही सेटिंग बंद करण्याचा काय फायदा?
गुगलच्या मते, एकदा ही सेटिंग बंद केल्यानंतर, गुगल सर्च, असिस्टंट आणि मॅप्स सोबतच्या तुमच्या संवादांचे ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या खात्यात सेव्ह केले जाणार नाहीत. तुम्ही साइन इन केले असले तरीही, तुमचा व्हॉइस डेटा सुरक्षित राहील आणि गुगल तो स्टोअर करू शकणार नाही. तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी वेळोवेळी या प्रायव्हसी सेटिंग्ज तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google गुपचूप ऐकतोय तुमचं बोलणं! एका ट्रिकने बंद करता येईल हेरगिरी
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement