कॉपी–पेस्ट म्हणजे फक्त Ctrl+C आणि Ctrl+V नाही, 99% लोकांना माहितच नाही योग्य वापर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना हे माहितच नाही की कॉपी–पेस्ट यापेक्षा जास्त उपयोगी आणि स्मार्ट पद्धतीनेही करता येऊ शकते.
मुंबई : सामान्यतः कॉपी–पेस्ट करणे हे जगातील सर्वात सोपे काम मानले जाते. पण खरं पाहिलं तर अजूनही बहुतेक लोकं कॉपी–पेस्टचा उपयोग फक्त Ctrl+C आणि Ctrl+V इतक्यापुरता मर्यादित ठेवतात.
अनेकांना हे माहितच नाही की कॉपी–पेस्ट यापेक्षा जास्त उपयोगी आणि स्मार्ट पद्धतीनेही करता येऊ शकते.
लोक कॉपी–पेस्ट कसे करतात?
कंप्यूटर किंवा लॅपटॉपवर काहीही कॉपी करण्यासाठी आपण सहसा Ctrl+C वापरतो आणि पेस्ट करण्यासाठी Ctrl+V. यात चुकीचं काही नसतं, पण एक महत्त्वाचं पाऊल लोक टाळतात. समजा तुम्हाला शेवटचं कॉपी केलेलं नव्हे तर त्याआधीचं काही कॉपी केलेलं पेस्ट करायचं असेल तर? अशावेळी लोक ते पुन्हा शोधून कॉपी करतात आणि मग पेस्ट करतात.
advertisement
यासाठी काय उपाय आहे?
तुम्ही मोबाइलमध्ये क्लिपबोर्ड (Clipboard) हा फीचर पाहिला असेल? इथे तुम्हाला आधी कॉपी केलेली गोष्ट ही दिसते. हाच फीचर आता संगणकातही उपलब्ध आहे. तुम्ही जे काही कॉपी करता ते सगळं या क्लिपबोर्डमध्ये साठवलं जातं. फक्त Win+V दाबलं की तुमच्यासमोर क्लिपबोर्ड उघडेल. त्यात तुम्ही कॉपी केलेलं सगळं कंटेंट दिसेल आणि हव्या त्या ठिकाणी पेस्टही करू शकाल.
advertisement
क्लिपबोर्ड कसा सुरु करायचा?
जर तुम्ही पहिल्यांदाच हा शॉर्टकट वापरत असाल, तर तो आधी सक्रिय (activate) करावा लागतो. त्यासाठी एकदा Win+V दाबा, त्यानंतर तुम्हाला फीचर सुरू करण्याचा पर्याय दिसेल. एकदा ऑन केल्यानंतर तुम्ही सहजपणे याचा वापर करू शकता.
क्लिपबोर्डमध्ये फक्त मजकूरच नाही तर स्मायली, GIFs आणि विशेष चिन्हं (symbols) टाकण्याचे पर्यायही मिळतात. त्यामुळे दैनंदिन कामं अधिक वेगवान आणि सोपी होतात.
advertisement
म्हणजेच, कॉपी–पेस्ट ही केवळ Ctrl+C आणि Ctrl+V इतकी मर्यादित गोष्ट नाही. Win+V चा वापर करून तुम्ही तुमच्या कॉपी–पेस्टच्या कामाला अधिक कार्यक्षम आणि स्मार्ट बनवू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 3:35 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
कॉपी–पेस्ट म्हणजे फक्त Ctrl+C आणि Ctrl+V नाही, 99% लोकांना माहितच नाही योग्य वापर


