advertisement

विद्यार्थ्यांचं आणखी एक काम सोपं करेल Gemini! फक्त एका टेक्स्टने होईल प्रेझेंटेशन

Last Updated:

Googleने Geminiमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे. ज्यामुळे तुम्ही फक्त एका प्रॉम्प्ट किंवा डॉक्युमेंटमधून संपूर्ण Google Slides प्रेझेंटेशन तयार करू शकता. हे स्मार्ट AI टूल कसे काम करते ते जाणून घ्या.

गुगल जेमिनी स्लाइड
गुगल जेमिनी स्लाइड
मुंबई : गुगलने त्यांच्या Gemini AIमध्ये एक शानदार नवीन फीचर जोडले आहे. जे आता फक्त काही शब्दांच्या प्रॉम्प्टवरून किंवा फाइलमधून संपूर्ण गुगल स्लाईड्स प्रेझेंटेशन तयार करू शकते. हे जेमिनीचे आतापर्यंतचे सर्वात पॉवरफूल आणि प्रॅक्टिकल अपडेट म्हणून वर्णन केले जात आहे.
हे नवीन फीचर Geminiच्या 'Canvas' टूलवर आधारित आहे. जे आधीच कंटेंट क्रिएशनसाठी वापरले जात होते. आता, ते यूझर्सना कोणताही आयडिया, डॉक्यूमेंट किंवा रिपोर्ट काही सेकंदात प्रोफेशनल आणि व्हिज्युअल प्रेझेंटेशन रूपांतरित करण्यास अनुमती देते.
जेमिनीसह Google Slides प्रेझेंटेशन कसे तयार करावे
Gemini अ‍ॅपमध्ये (वेबवर उपलब्ध), यूझर्सना फक्त टूलबारमधून 'Canvas' ऑप्शन निवडावा लागेल आणि ‘Create a presentation’ असे म्हणावे लागेल. तुम्ही 'Roman Republicवर लेसन तयार करा' असा टॉपिक प्रविष्ट करू शकता किंवा फाइल अपलोड करू शकता—जसे की रिसर्च रिपोर्ट, नोट्स किंवा सेल्स ब्रीफ.
advertisement
त्यानंतर Gemini आपोआप एक मल्टी-स्लाइड प्रेझेंटेशन तयार करते. ज्यामध्ये टायटल, हेडिंग्स, पॉइंट्स आणि संबंधित इमेजेजचा समावेश असतो. यूझर तयार केलेल्या स्लाइड्स थेट Google Slides वर निर्यात करू शकतात आणि तेथे त्या एडिट किंवा कस्टमाइज करू शकतात.
advertisement
हे फीचर कोण वापरू शकते?
गुगलच्या मते, हे नवीन जेमिनी Gemini Slides विविध प्रकारच्या यूझर्ससाठी फायदेशीर ठरेल:
प्रोफेशनल्स: त्यांचे बिझनेस डॉक्यूमेंट किंवा रिपोर्ट्स जलद पॉलिश प्रेझेंटेशनमध्ये रूपांतरित करू शकतात.
टीचर्स: लेक्चर नोट्समधून काही सेकंदात व्ह्युज्युअल आणि स्ट्रक्चर्ड लेसन तयार करू शकतात.
स्टूडेंट्स: त्यांचे एस्से किंवा प्रोजेक्ट्स आकर्षक स्लाइड्समध्ये रूपांतरित करू शकतात.
advertisement
हे फीचर कधी उपलब्ध होईल?
गुगलने म्हटले आहे की, हे फीचर आता हळूहळू सुरू होत आहे आणि 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व यूझर्ससाठी उपलब्ध होईल. ते जेमिनी वेब (gemini.google.com) आणि मोबाइल वेबवर उपलब्ध असेल, अँड्रॉइड आणि iOS अॅप्स लवकरच येत आहेत.
advertisement
हे फीचर जवळजवळ सर्व Google Workspace यूझर्सना (Business, Enterprise, Education  आणि Nonprofits) मिळेल, तसेच Google AI Pro आणि Gemini Ultra सब्सक्राइबर्सना देखील याचं अ‍ॅक्सेस असेल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
विद्यार्थ्यांचं आणखी एक काम सोपं करेल Gemini! फक्त एका टेक्स्टने होईल प्रेझेंटेशन
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement