Google Mapsचे हे 12 सीक्रेट माहितीये का? 90% लोकांना माहितीच नाहीत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Google Maps Hidden Features: गुगल मॅपचा वापर एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी केला जातो. ते तुम्हाला लोकेशनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगते. पण त्याची व्याप्ती फक्त लोकेशन दाखवण्यापुरती नाही. चला Google Maps च्या त्या 12 सीक्रेट फीचर्स विषयी जाणून घेऊया, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
Google Maps Secret Features: गूगल मॅप्स हे केवळ एक मॅपिंग ॲप नाही तर ते एक पॉवरफूल साधन आहे. जे तुमचा प्रवास आणि अनुभव सुधारू शकते. हे जगातील एक लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. परंतु विशिष्ट ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग दाखवण्याव्यतिरिक्त, यात अनेक उत्कृष्ट फीचर्स देखील आहेत. चला Google Maps ची 12 सीक्रेट फीचर्स पाहूया, ज्याबद्दल सर्वांनाच माहिती नाही.
या आर्टिकल आम्ही तुम्हाला गुगल मॅपच्या काही सीक्रेट फीचर्सबद्दल सांगणार आहोत. ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. अशा हिडन फीचर्सवर एक नजर टाकूया.
1. लाइव्ह व्ह्यू(Live View)
हे फीचर तुमचा कॅमेरा वापरून तुमच्या सभोवतालचे वातावरण स्कॅन करते. याचा अर्थ, तुम्ही ॲपच्या वर असलेल्या कॅमेरा आयकॉनवर टॅप कराल आणि ते तुम्हाला रिअल-टाइममध्ये जवळपासच्या ठिकाणांची माहिती देते, जसे की जवळपासची रेस्टॉरंट, एटीएम, पब्लिक ट्रान्सपोर्ट स्टॉप किंवा ऐतिहासिक पर्यटन ठिकाणे.
advertisement
2. द पिन मॅन (The Pin Man)
हे एक मजेदार फीचर आहे. ज्यामध्ये पिवळ्या रंगाचा पेग मॅन दिसतो. हे फीचर स्ट्रीट व्ह्यूमध्ये वापरले जाते. यलो पेग मॅनच्या माध्यमातून तुम्ही आजूबाजूचे ठिकाण अगदी खऱ्या वस्तूप्रमाणे पाहू शकता. ॲपमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे तुम्ही पेग मॅनला इकडे-तिकडे पाठवू शकता.
3. 360 डिग्री व्हिडिओ(360 Degree Video)
Google मॅप्स तुम्हाला विविध ठिकाणांचे 360 डिग्री व्हिडिओ पाहण्याची परवानगी देते. यासोबतच तुम्हाला 360 डिग्री व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी देखील देते. स्ट्रीट व्ह्यू स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही 360 डिग्री व्हिडिओ तयार आणि अपलोड करू शकता.
advertisement
4. व्हॉइस गायडेन्स(Voice Guidance)
Google व्हॉइस गायडेन्स सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉइस गायडेन्स प्रणालीद्वारे, ते लोकांना योग्य ठिकाणी पाऊल ठेवण्याची माहिती देते. ज्यांची दृष्टी कमकुवत आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते.
5. कन्वर्सेशनल सर्च (Conversational Search)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची जबरदस्त ताकद तुम्ही Google Maps मध्ये पाहू शकता. तुम्ही AI द्वारे Google Maps ला लोकेशनबद्दल विचारू शकता. जसे तुम्ही एखाद्या माणसाला विचारता. हे फीचर तुम्हाला नवीन ठिकाणे शोधण्यात खूप मदत करेल.
advertisement
6. एआय अपडेट्स आणि नो-कोड टूल्स
AI द्वारे काम करणारी अनेक शानदार फीचर्स Google Maps सतत सादर करत आहे. हे अॅप एआय-पॉवर्ड फीचर्स आणि नो-कोड टूल्ससह अपडेट होत राहतो. जो तुमचा सर्च एक्सपीरियन्स आणखी सोपा बनवते.
7. एक्सेसिबिलिटी माहिती (Accessibility Information)
गुगल मॅपमध्ये अनेक ठिकाणांची एक्सेसिबिलिटी माहिती उपलब्ध असेल. व्हील चेअरच्या आयकॉनवर टॅप करून, अपंग लोकांसाठी जागा सोयीस्कर आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता.
advertisement
8. 3D इमर्सिव्ह व्ह्यू (3D Immersive View)
हे फीचर आपल्याला एखाद्या ठिकाणाचे 3D मॉडेल पाहण्याची परवानगी देते. याच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही ठिकाणाची सविस्तर माहिती मिळते. 3D द्वारे, तुम्ही त्या ठिकाणी असलेल्या बिल्डिंग्स, पार्क, रस्ते इ. अगदी वास्तविक असल्यासारखे पाहतात.
9. लेन्स इम मॅप्स (Lens in Maps)
AI सह सुसज्ज, हे फीचर तुम्हाला तुमचा कॅमेरा वापरून कोणत्याही ठिकाणाची किंवा वस्तूची माहिती देते. तुम्ही तुमचा कॅमेरा कोणत्याही ठिकाणी धरून ठेवा आणि Google Maps तुम्हाला त्या ठिकाणाची माहिती रिअल-टाइममध्ये देईल.
advertisement
10. डू नॉट ड्राइव्ह (Do not Drive)
हे फीचर तुम्हाला अशी ठिकाणे शोधण्यात मदत करते जिथे तुम्ही ड्रायव्हिंगशिवाय जाऊ शकता. हे फीचर तुम्हाला राइड-शेअरिंग ऑप्शन दाखवते जेणेकरुन तुम्ही स्वतः गाडी चालवण्याऐवजी राइड-शेअरिंगद्वारे तुमच्या इच्छितस्थळी पोहोचू शकता.
11. एआय पावर्ड सर्च विद फोटोज
गुगल मॅपवर अपलोड केलेल्या फोटोंच्या मदतीने तुम्ही कोणतीही जागा शोधू शकता. हे फीचर फोटोमधील वस्तू आणि ठिकाणे ओळखण्यासाठी AI चा वापर करते आणि तुम्हाला त्याच्याशी संबंधित रिझल्ट दाखवते.
advertisement
12. फ्लाइट प्राइज (Flight Prices)
तुम्ही Google Maps वर फ्लाइटच्या किमती देखील शोधू शकता. हे तुम्हाला वेगवेगळ्या एअरलाइन्सच्या फ्लाइटच्या किमतींची तुलना करू देते. यामुळे तुम्हाला तुमच्या ट्रिपचे प्लॅन करणे सोपे जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2024 11:54 AM IST