वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी इंटरनेटवर शोधला नंबर! महिलेला लाखोंचा चुना

Last Updated:

घरात कोणतीही वस्तू खराब झाली तर आपण ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित व्यक्तीला कॉल करत असतो. अशावेळी अनेक लोक इंटरनेटवरुन नंबर मिळवतात. पण हेच करणं एका महिलेला महागात पडलंय.

Mumbai Police E- Challan Scam: व्हॉट्स ॲपवर येणाऱ्या फेक 'ई- चलन' मेसेजपासून सावधान! वाहतूक शाखेचा सावधगिरीचा इशारा; अशी घ्या खबरदारी
Mumbai Police E- Challan Scam: व्हॉट्स ॲपवर येणाऱ्या फेक 'ई- चलन' मेसेजपासून सावधान! वाहतूक शाखेचा सावधगिरीचा इशारा; अशी घ्या खबरदारी
छत्रपती संभाजीनगर : घरातील वॉशिंग मशीन हा खराब झाला आणि तो दुरुस्त करण्यासाठी महिला उपाय शोधू लागली. यासाठी तिने कंपनीच्या सर्व्हिस सेंटरचा नंबर इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेची मोठी फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी या महिलेची फसवणूक केली आहे. महिलेला सर्व्हिस सेंटरच्या नावाने एक नंबर मिळाला तो सायबर गुन्हेगाराचा होता.
या महिलेला वॉशिंग मशीन दुरुस्त करण्यासाठी एक फॉर्म देण्यात आला. हा फॉर्म लिंक ओपन करुन भरायचा होता. मात्र त्याने या लिंकच्या सहाय्याने महिलेचा मोबाईल हॅक केला. मोबाईल हॅक करताच त्याने तब्बल 2 लाख 64 हजार रुपयांना महिलेला गंडा घातला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
advertisement
कसा घडला प्रकार? 
एका 28 वर्षिय गृहिणी कुटुंबासह सिडको परिसरात राहते. पती डॉक्टर आहेत. महिलेची वॉशिंग मशीन खराब झाली होती. महिलेने 12 सप्टेंबर रोजी सॅमसंग सर्व्हिसिंग सेटर नावाने हेल्पलाइन नंबर शोधला. या नंबरवर महिलेने संपर्क केला. या कॉलवरील व्यक्तीने महिलेला दुसऱ्या क्रमांकावरुन संपर्क साधला. फॉर्मसाठी लिंक पाठवली. रिपेअर सर्व्हिस अशी एपीके फाइल व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आली. कॉलवर असलेल्या व्यक्तीने 5 रुपये पाठवण्यास सांगितले. पण ते पैसे गेले नाही. त्यानंतर त्याने दुरुस्तीस आल्यानंतर पैसे देण्यास सांगितले.
advertisement
कशी झाली फसवणूक 
गुन्हेगारांनी पाठवलेली एपीके फाइल अधिकृत अ‍ॅप नव्हते. ते इंस्टॉल केल्याने मोबाईलचा गुन्हेगारांना रिमोट अ‍ॅक्सेस मिळतोय. त्यामुळे गुन्हेगारांना महिला मोबाईलमध्ये करत असलेली प्रत्येक गोष्टी टाइप करत असलेली अक्षरं दिसत होती. हेच पाहून त्याने बँक अकाउंट रिकामं केलं. महिलेला आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच बँकेशी संपर्क केला. त्यानंतर अकाउंट गोठवले.
advertisement
फसवणूक कशी टाळावी?
- गुगल किंवा सर्च इंजिनवर मिळालेल्या नंबरवर अजिबात विश्वास ठेवू नका.
- प्रोडक्टच्या अधिकृत वेबसाइटवरुनच हेल्पलाइन नंबर किंवा ई-मेलआयडी वापरा.
- अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंक किंवा फाइल्सवर क्लिक करु नका.
- कोणत्याही लिंकवर वैयक्तिक माहिती शेअर करु नका.
advertisement
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी इंटरनेटवर शोधला नंबर! महिलेला लाखोंचा चुना
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement