Tech News: फ्रीमध्ये चकाचक होईल वॉशिंग मशीन, फक्त फॉलो करा ही ट्रिक; कपड्यांचा येईल जबरदस्त सुगंध
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Washing Machine Clean at home: तुमचे वॉशिंग मशीन नवीनसारखे चमकत राहावे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ही सोपी पद्धत नक्कीच वापरून पहा. चला जाणून घेऊया कोणती आहे ती सोपी पद्धत...
मुंबई : वॉशिंग मशीन घरातील मोठी गरज असते. कपडे स्वच्छ निघावेत यासाठी वॉशिंग मशीनची देखरेख योग्य वेळी करणं गरजेचं असतं. विचार करा की, वॉशिंग मशीन खराब झाली तर सर्व कपडे तुम्हाला हाताने धुवावे लागतील. जे खूप मेहनतीचं काम असतं. तुम्ही वॉशिंग मशीनची स्वच्छता केली नाही तर ज्या बॉक्समध्ये डिटर्जेंट टाकलं जातं, तिथे काही दिवसांनी साबण आणि सॉफ्टनर जमा होतो आणि आपण हे पाहूही शकत नाही. याशिवाय, कपडे सतत धुणे आणि ओले राहणे यामुळे, वॉशरच्या झाकणाच्या आत देखील बुरशी तयार होऊ शकते. त्यामुळे वॉशिंग मशीनचे ड्रम वेळोवेळी स्वच्छ करत राहणे गरजेचे आहे.
वॉशिंग मशिन वापरल्यानंतर लगेच आपण त्याचे झाकण बंद करतो आणि त्यामुळेच अनेकदा ओलाव्यामुळे वास येऊ लागतो. पण यावरील उपाय अगदी सोपा आहे. तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही तुमचे वॉशिंग मशिन चमकदार बनवू शकता आणि सुगंधी देखील बनवू शकता.
advertisement
हा आहे सोपा मार्ग
यासाठी सर्वप्रथम तुम्ही बेकिंग सोडा आणि पाणी वापरू शकता. तुम्हाला ¼ कप पाण्यात ¼ कप बेकिंग सोडा मिसळावा लागेल. हे द्रावण तुमच्या मशीनच्या डिटर्जंट कंटेनरमध्ये घाला. मग एकदा तुम्ही बेकिंग सोडा सोल्यूशन आणि व्हिनेगर मिसळल्यानंतर, मशीनला रेग्युलर सायकलवर चालवता. त्यासाठी नुसते स्पिन किंवा रिन्स नाही तर संपूर्ण सायकल सेटिंग वापरावी लागेल.
advertisement
ब्लीच, अमोनिया किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड यांसारख्या इतर साफसफाईच्या द्रावणांमध्ये व्हिनेगर कधीही मिसळू नये. यापैकी काही मिश्रणे एकत्र मिसळल्यास धोकादायक धूर निर्माण करू शकतात आणि आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. याशिवाय ड्रममध्ये जे काही द्रावण टाकले आहे ते नीट स्वच्छ करून घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 04, 2023 10:54 AM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Tech News: फ्रीमध्ये चकाचक होईल वॉशिंग मशीन, फक्त फॉलो करा ही ट्रिक; कपड्यांचा येईल जबरदस्त सुगंध









