तुम्ही घेतलेला iphone डुप्लिकेट तर नाही? कसं ओळखाल वापरा या सोप्या टिप्स
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
जर तुम्हाला या स्कॅमपासून स्वतःला वाचावायचं असेल आणि तुमचे पैसे वाया घालवायचे नसतील तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही डुप्लिकेट आयफोन मॉडेल ओळखू शकता.
मुंबई, 12 सप्टेंबर : सध्या एकापेक्षा एक फीचर्स असलेले फोन आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांना वेगवेगळ्या ब्रँडचे फोन आवडतात. फोनच्या सर्वात महागड्या ब्रँडपैकी एक म्हणजे अॅपल होय. अॅपलचे आयफोन खूप महाग विकले जातात आणि त्याची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ असते. आयफोन 15 सीरिज लवकरच ग्लोबली लाँच होणार आहे आणि जगभरात त्याबद्दल खूप उत्सुकता आहे. ही सीरिज अनेक मोठ्या बदलांसह लाँच केली जाणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की बाजारात नवीन आयफोन सीरिज लाँच होण्याआधीच त्याची डुप्लिकेट मॉडेल्स तयार केली जातात. अशा परिस्थितीत मूळ मॉडेलच्या नावाने डुप्लिकेट मॉडेल कोणालाही विकलं जाऊ शकतं. जर तुम्हाला या स्कॅमपासून स्वतःला वाचावायचं असेल आणि तुमचे पैसे वाया घालवायचे नसतील तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही डुप्लिकेट आयफोन मॉडेल ओळखू शकता.
डिस्प्लेची क्वालिटी
ओरिजनल आयफोनचा डिस्प्ले खूप ब्राइट आणि अतिशय स्मूद असतो, परंतु जर तुमच्या घरी आलेल्या आयफोनच्या डिस्प्लेमध्ये या गोष्टी दिसत नसतील, तर तर तो आयफोन डुप्लिकेट असू शकतो. डुप्लिकेट आयफोन मॉडेल्सचे डिस्प्ले खराब क्वालिटीचे आणि डल असतात. तो खूप स्लो चालतो, यावरून तो फोन डुप्लिकेट आहे, हे तुम्ही ओळखू शकता.
advertisement
साइड प्रोफाइल चेक करा
अनेक वेळा फोनचं फ्रंट व बॅक डिझाइन सेम असतं, अशा परिस्थितीत डुप्लिकेट आणि खरा आयफोन शोधणं कठीण होऊ शकतं, परंतु जर तुम्ही त्याच्या कडा चेक केल्या तर त्यावरून तुम्हाला डुप्लिकेट आयफोनमध्ये काहीतरी कमतरता दिसून येतील, ज्या ओरिजनलपेक्षा वेगळ्या असतात. कारण आयफोनची हुबेहूब कॉपी बनवणं कठीण आहे. फोनच्या कडा पाहून तुम्ही सहजपणे शोधू शकता की आयफोन डुप्लिकेट आहे की खरा.
advertisement
बॅक पॅनल चेक करणं गरजेचं
ओरिजनल आयफोन मॉडेलमध्ये तुम्हाला दिलेलं बॅक पॅनल काचेचं असतं आणि ते बघून किंवा स्पर्श करून सहज ओळखता येतं, तर डुप्लिकेट आयफोन मॉडेलमध्ये ते प्लास्टिकचं असतं, त्यामुळे तुम्ही बारकाईने बघितल्यास त्यातला फरक तुम्हाला ओळखता येतो.
अॅक्सेसरिज चेक करा
आयफोनसोबत तुम्हाला फार जास्त अॅक्सेसरिज मिळत नाहीत, पण जर तुमच्याकडे त्याची लाइटनिंग केबल असेल, तर त्यावरून तुम्ही फोन ओळखू शकता. कारण डुप्लिकेट आयफोनची लाइटनिंग केबल थोडी पातळ असते आणि त्याची क्वालिटी खराब असते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2023 3:46 PM IST


