7,499 रुपयांत लॉन्च झाला बजेट फोन! मिळेल दमदार बॅटरीसह भारी डिस्प्ले
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Lava Bold N2 हा फोन भारतामध्ये 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी, 90Hz HD+ डिस्प्ले, Android 15 Go, IP64 रेटिंग आणि 13MP कॅमेरा मिळतो. जाणून घेऊया सेल डेट आणि पूर्ण स्पेसिफिकेशन्स...
मुंबई : नोएडा येथील स्मार्टफोन कंपनी लावा इंटरनॅशनलने आज म्हणजेच 17 फेब्रुवारीला भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Lava Bold N2 लॉन्च केल्या आहेत. हा फोन या महिन्याच्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध होईल. ही विशेषतः ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon च्या माध्यमातून खरेदी करता येईल.
लावा Bold N2 ची भारतात किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. हा फोन 27 फेब्रुवारीपासून Amazon वर एक्सक्लूसिव्ह विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनी याला दोन कलर ऑप्शन - Indus Black आणि Siachen White मध्ये सादर करत आहे. सोबतच ग्राहकांना फ्री डोरस्टेप सर्व्हिसिंगची सुविधाही दिली जात आहे. जाणून घेऊया कसे आहेत लावाच्या नवीन फोनचे फीचर्स...
advertisement
Lava Bold N2 मध्ये 6.75-इंचचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. स्क्रिनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन मिळतो. कंपनीचा दावा आहे की, हा फोन IP64 रेटिंगसह येतो. म्हणजेच तो धूल आणि हलक्या पाण्याच्या थेंबानी सुरक्षित राहील.
advertisement
परफॉर्मेंस आणि सॉफ्टवेयर
हा स्मार्टफोन Android 15 गो वर चालतो आणि कंपनीच्या मते, यात कोणतेही ब्लोटवेअर किंवा जाहिराती नाहीत, ज्यामुळे यूझर्सना "क्लीन Android एक्सपीरिएंस" मिळतो.
फोनमध्ये Unisoc SC9863A ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आहे. ज्याला व्हर्चुअल RAM च्या माध्यमातून 4GB पर्यंत वाढवला जाऊ शकतो.
advertisement
कॅमेरा आणि बॅटरी
Lava Bold N2 मध्ये 13MP चा प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. जो स्क्वायर शेप्ड मॉड्यूलमध्ये फिट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
यात 5,000mAh बॅटरी आहे. सुरक्षेसाठी बाजूला बसवलेले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. मोठी स्क्रीन, 90Hz रिफ्रेश रेट आणि कमी किमतीत स्वच्छ अँड्रॉइड एक्सपीरिएंससह, Lava Bold N2 हा बजेट सेगमेंटमध्ये एक मजबूत ऑप्शन म्हणून वेगळा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 5:34 PM IST








