15,000 रुपयांहून कमीमध्ये मिळतोय 6500mAh बॅटरीचा 5G फोन! Oppo K14x 5G वर डिस्काउंट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Oppo K14x 5G भारतात Flipkart आणि वेबसाइटवर उपलब्ध आहे. 50MP कॅमेरा , MediaTek Dimensity 6300, 6,500mAh बॅटरी,120Hz डिस्प्ले आणि 14,999 रुपयांपासून सुरु किंमतीत भारी ऑप्शन आहे.
मुंबई : ओप्पोने भारतात आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन Oppo K14x 5G गेल्या आठवड्यात लॉन्च केला आहे. हा फोन 10 फेब्रुवारीला सादर करण्यात आला होता आणि आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart आणि कंपनीची ऑफिशियल वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. दमदार बॅटरी, 50MP कॅमेरा आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह हा डिव्हाइस मिड-रेंज सेगमेंटमध्ये मजबूत ऑप्शन ठरला आहे.
Oppo K14x 5G ची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे. ज्यामध्ये 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. तसंच 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक SBI, HDFC आणि ICICI बँक कार्डने खरेदी केल्यावर 1,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकतात. या व्यतिरिक्त नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शनही उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Icy Blue आणि Prism Violet कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
डिस्प्ले आणि परफॉर्मेंस
या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,125 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोन अँड्रॉइड 15 वर बेस्ड ColorOS 15 वर चालतो. यामध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 चिपसेट, ARM Mali-G57 MC2 GPU आणि 6GB पर्यंत LPDDR4x RAM दिला आहे. 128GB UFS 2.2 स्टोरेजसह हा फोन स्मूद परफॉर्मेंस देण्याता दावा करतो.
advertisement
कॅमेरा फीचर्स
फोटोग्राफीसाठी Oppo K14x 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये 50MP चा प्राइम कॅमेरा आणि 2MP चा मोनोक्रोम सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 1080p/60fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
advertisement
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स
या स्मार्टफोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची 6,500mAh बॅटरी, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये Wi-Fi 5, Bluetooth 5.4, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे. फोनमध्ये IP64 डस्ट अँड स्प्लॅश रेझिस्टन्स रेटिंग आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
Oppo K14x 5G हा बजेट सेगमेंटमध्ये एक आकर्षक 5G स्मार्टफोन ठरू शकतो, ज्यामध्ये दीर्घ बॅटरी लाइफ आणि संतुलित फीचर्स आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 7:08 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
15,000 रुपयांहून कमीमध्ये मिळतोय 6500mAh बॅटरीचा 5G फोन! Oppo K14x 5G वर डिस्काउंट









