दिवाळीत मोबाईल ब्लास्ट होण्याचा धोका? काय करायचं-काय करु नये, 'या' टिप्स ठरतील लाइफसेव्हर

Last Updated:

चला तर पाहूया अशा 5 इमर्जन्सी टिप्स, ज्या दिवाळीतच नाही तर कुठल्याही वेळी कामी येतील.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : दिवाळीचा काळ म्हणजे रोषणाई, उत्साह आणि आनंदाचा मौसम. पण या आनंदात एक छोटीशी बेपर्वाई मोठा धोका बनू शकते. विशेषतः मोबाईल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे. अलीकडे अनेक वेळा असे प्रकार समोर आले आहेत की फोनमधून अचानक धूर बाहेर पडतो, ठिणग्या निघतात किंवा तोच फुटतो. हे प्रसंग घडल्यावर बहुतेक लोक घाबरतात. त्यामुळे अशा प्रसंगी काय करावं आणि काय करू नये, हे अमनेकांना माहित नसतं आणि तेच जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
चला तर पाहूया अशा 5 इमर्जन्सी टिप्स, ज्या दिवाळीतच नाही तर कुठल्याही वेळी कामी येतील.
1. फोनला हात लावू नका, थोडं अंतर ठेव
मोबाईल फुटत असताना त्यातून धूर, ठिणग्या आणि गरम तुकडे बाहेर येतात. अशावेळी घाबरून फोन उचलण्याची किंवा फेकण्याची चूक अजिबात करू नका. स्वतःपासून आणि इतरांपासून किमान 2–3 मीटरचं अंतर ठेवा.
advertisement
2. फोनवर पाणी ओतू नका, वाळू किंवा माती वापर
मोबाईलची बॅटरी साधारणपणे Lithium-Ion प्रकारची असते. फोनला आग लागल्यावर त्यच्याा बॅटरीवर पाणी टाकल्यास स्फोट आणखी वाढू शकतो. त्याऐवजी फोनवर वाळू, माती किंवा कोरडं कपडं टाकून झाकून ठेवा, ज्यामुळे ऑक्सिजन कमी मिळेल आणि आग पसरू शकणार नाही.
3. जवळचे कपडे, पडदे किंवा फटाके तात्काळ दूर करा
फोनमधून धूर निघत असेल किंवा तो फुटला असेल तर त्यातील ठिणग्या जवळच्या कपड्यांना, पडद्यांना किंवा फटक्यांना लागून आग लागू शकते. त्यामुळे सर्व ज्वलनशील वस्तू शक्य तितक्या लवकर दूर करा.
advertisement
4. धूर पसरत असेल तर खिडक्या उघडा
बॅटरी जळाल्यानंतर तयार होणारा धूर श्वासाद्वारे शरीरात गेला तर तो नाक आणि फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे त्वरित खिडक्या उघडा, पंखा लावा आणि घरातील हवा बाहेर जाण्याची व्यवस्था करा.
5. जळालेला फोन कचरापेटीत टाकू नका
फोन थंड झाल्याशिवाय त्याला हलवू नका. बॅटरी अनेकदा काही तासांनंतरही पुन्हा गरम होऊ शकते. तो मेटलच्या भांड्यात ठेवून थंड होऊ द्या, आणि नंतर अधिकृत E-Waste सेंटर किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये जमा करा. थेट कचरापेटीत टाकणं किंवा जाळणं पर्यावरणासाठी घातक आहे.
advertisement
जर शक्य असेल तर दूरून दुसऱ्या मोबाईलने व्हिडिओ किंवा फोटो काढा. कारण काहीवेळा फोन तुमच्या चुकीशिवायही फुटतो. अशा प्रसंगात हे पुरावे कंपनीला दाखवून रिप्लेसमेंट किंवा नुकसानभरपाई मिळवणं सोपं होतं.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
दिवाळीत मोबाईल ब्लास्ट होण्याचा धोका? काय करायचं-काय करु नये, 'या' टिप्स ठरतील लाइफसेव्हर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement