advertisement

फोनमध्ये दिसताय हे संकेत? लगेच व्हा सावध, असू शकतो व्हायरस

Last Updated:

फोनमध्ये व्हायरस आला असेल तर काही संकेत दिसू लागतात. फोन लवकर गरम होत असेल, बॅटरी झपाट्याने डिस्चार्ज होत असेल आणि फोनची स्पीड स्लो झाली असेल, तर सतर्क राहण्याची गरज आहे.

टेक्नॉलॉजी न्यूज
टेक्नॉलॉजी न्यूज
मुंबई : आजकाल लोक त्यांच्या वापरातील प्रत्येक गोष्ट मोबाईलमध्ये ठेवतात. चित्रपटाच्या तिकिटांपासून ते ड्रायव्हिंग लायसन्सपर्यंत सर्व काही मोबाइलमध्ये साठवले जाते. आजकाल डिजिटल व्यवहारांसाठीही मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा स्थितीत हॅकर्सचे लक्ष मोबाईलकडेही गेले आहे. ते मालवेअर किंवा व्हायरसद्वारे मोबाइलला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात. जर फोनमध्ये मालवेअर आला तर खूप नुकसान होऊ शकते. फोनमधील व्हायरस कसा शोधायचा ते पाहूया.
सतत पॉप-अप जाहिराती
फोनवर पॉप-अप जाहिराती सतत दिसत असतील आणि त्या स्क्रीनवरून काढून टाकणे कठीण असेल तर ते मालवेअरमुळे असू शकते. या जाहिरातींवर क्लिक केल्यास फोनमध्ये असलेली पर्सनल माहिती चुकीच्या हातात पडू शकते.
कोणत्याही कारणाशिवाय बिलात वाढ
कोणतीही अतिरिक्त सेवा न घेता तुमच्या फोनचे बिल वाढले असेल, तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. क्रॅमिंगमुळे अनेक वेळा बिल वाढते. क्रॅमिंग म्हणजे थर्ड पार्टी कंपनी तुमच्याकडून अशा सेवेसाठी शुल्क आकारते ज्याचा तुम्ही वापरही केला नाही. हे काम मालवेअरद्वारे करता येते.
advertisement
बॅटरी लवकर डिस्चार्ज
मालवेअरचे एक संकेत म्हणजे बॅटरीचे फास्ट डिस्चार्ज होते. अनेक मालवेअर बॅकग्राउंडमध्ये वेगवेगळी टास्क करत राहतात. यामुळे बॅटरी लवकर संपते. त्याचप्रमाणे, सामान्य स्थितीतही फोन खूप गरम होत असेल तर ते मालवेअरमुळे देखील असू शकते.
advertisement
फोनची स्पीड कमी होणे
फोनमध्ये मालवेअर असेल तर फोनचा कामाचा वेग कमी होतो. खरंतर, मालवेअर फोनच्या कंपोनेंटकडून खूप काम घेते. अशा स्थितीत फोनची इतर कामे मंद होतात आणि काही वेळा टास्क क्रॅशही होतात.
फोनवर नको असलेले ॲप येत आहे
अनेक वेळा एखादे ॲप डाउनलोड करताना त्याच्यासोबत मालवेअरही डाऊनलोड केले जाते, ज्यामुळे फोनवर अतिरिक्त ॲप्स इन्स्टॉल होतात. त्यामुळे ॲप लिस्टवर लक्ष ठेवा आणि कोणतेही नको असलेले ॲप इन्स्टॉल केले असल्यास ते उघडू नका.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
फोनमध्ये दिसताय हे संकेत? लगेच व्हा सावध, असू शकतो व्हायरस
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement