3 दिवस साप घरी ठेवला… मालिशच्या बहाण्याने दिला मृत्यूचा डंख, पत्नीचा क्रूर अंत; काँग्रेसच्या नेत्याचा सैतानी डाव

Last Updated:

रुपेश बसल्यानंतर ऋषीकेशने निरजा आंबेरकरच्या डाव्या पायाच्या घोटयाजवळ तीन वेळा सर्पदंश करून जीवे मारल्याचे समोर आले.

News18
News18
गणेश मंजुळा अनंत, प्रतिनिधी
मुंबई :  राज्यात खळबळ उडवणाऱ्या घटनेत काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकारी महिलेची विषारी सर्पदंश करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही हत्या पतीनेच सर्पमित्राच्या मदतीने घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी तीन वर्षांनंतर या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पतीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पतीचे नाव रुपेश आंबेकर तर पत्नीचे नाव नीरजा आंबेकर होते.
advertisement
मृत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पतीने हा प्रकार अकस्मात मृत्यू असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. सुरुवातीला घटनास्थळी कोणतीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालातही ठोस संशय नोंदवला गेला नव्हता. मात्र, कालांतराने काही तांत्रिक बाबी, साक्षीदारांचे जबाब आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना या मृत्यूबाबत संशय बळावला.
advertisement

पतीने दिली गुन्ह्याची कबुली 

पोलिसांनी पुन्हा तपास सुरू करत मृत महिलेच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांची आणि स्थानिक नागरिकांची चौकशी केली. तपासादरम्यान पतीचे वर्तन, त्याचे आर्थिक व कौटुंबिक वाद, तसेच एका सर्पमित्राशी असलेले संबंध संशयास्पद वाटू लागले. सखोल चौकशीत पतीने गुन्ह्याची कबुली दिली असून, सर्पमित्राच्या मदतीने विषारी साप आणून पत्नीला सर्पदंश करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.
advertisement

तीन वर्षानंतर केस पुन्हा कशी उघडली?

बदलापूरमधील मुरमाड विधानसभेच्या अध्यक्ष निरजा आंबेकर यांची तीन वर्षापूर्वी हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरजा आंबेकरच्या मृत्यूची चौकशी करताना मागील सहा महिन्यापूर्वी काही गोपनीय माहिती मिळाली. डिसेंबरमध्ये एक हाफ मर्डरचा आरोपी अटक केला होता. हा आरोपी गुन्ह्याशी संबंधित असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याची चौकशी केली असता त्याने माहिती पुरवली.त्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचे समोर आले आहे.
advertisement

कशी केली हत्या? 

एका सर्पमित्राकडून विषारी साप घेतला. त्या सापाला तीन - चार दिवस घरी आणून सांभळले. एके दिवशी पत्नीला तुझा पाय दुखतो म्हणून पायाची मालिश करण्यासाठी मसाजवाला बोलावलं आहे असे सांगितले.
पत्नी निरजाला हॉलमध्ये चटई टाकुन त्यावर पालथे झोपविले. तसे कुणाल चौधरी याने तीच्या पायास मालीश
करण्याचा बहाणा केला असता, चेतन दुधाने हा सर्पमित्र असल्याने त्याने किचनमधील गोणीतील साप
advertisement
स्टीकने काढुन ऋषीकेश चाळके यांचे हातात दिला. त्यावेळी रुपेश आंबेकर यास पत्नीच्या पाठीवर बसण्यास सांगितले. रुपेश बसल्यानंतर ऋषीकेशने निरजा आंबेरकरच्या डाव्या पायाच्या घोटयाजवळ तीन वेळा सर्पदंश करून जीवे ठार मारल्याचे समोर आले.

सर्पमित्रासह आणखी दोन जणांनी पतीला  केली मदत 

या कटात सहभागी असलेल्या सर्पमित्रासह आणखी दोन जणांनी पतीला मदत केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल देणाऱ्या संबंधित डॉक्टरांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, कारण प्राथमिक तपासात अहवालातील काही बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ 

तीन वर्षांनंतर उघडकीस आलेल्या या हत्याकांडामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
3 दिवस साप घरी ठेवला… मालिशच्या बहाण्याने दिला मृत्यूचा डंख, पत्नीचा क्रूर अंत; काँग्रेसच्या नेत्याचा सैतानी डाव
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement