Dhurandhar: रणवीर, अक्षय, संजय दत्तवर FIR दाखल करण्यासाठी कोर्टात याचिका; अपमानास्पद चित्रण केल्याचा दावा

Last Updated:
Dhurandhar: बॉलिवूडमध्ये सध्या फक्त ‘धुरंधर’ या एकाच चित्रपटाची चर्चा आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे ती अक्षय खन्ना याने साकारलेल्या व्यक्ती रेखेमुळे. पाकिस्तानमधील भारतीय गुप्तहेराची स्टोरी असेलल्या या चित्रपटात काही असे दृश्य आहे त्यामुळे आखाती देशात त्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशात आता पाकिस्तानमधून या चित्रपटावर मोठी अपडेट येत आहे.
1/7
पाकिस्तानातील कराची शहरातील एका न्यायालयात भारतीय चित्रपट ‘धुरंधर’ विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की या चित्रपटात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचे फोटो, पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चा झेंडा आणि पक्षाच्या रॅलींचे दृश्ये कोणतीही परवानगी न घेता वापरण्यात आली आहेत.

advertisement
2/7
याशिवाय चित्रपटात PPP ला दहशतवादाला पाठिंबा देणारी पार्टी म्हणून दाखवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ही याचिका PPP च्या कार्यकर्ते मोहम्मद आमिर यांनी कराचीच्या डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट (साउथ) मध्ये दाखल केली आहे.

3/7
याचिकेत चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता, कलाकार आणि चित्रपटाच्या निर्मिती व प्रचाराशी संबंधित सर्व व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत प्रमुख अभिनेता रणवीर सिंह याच्यासह संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेनी यांची नावे आहेत. तसेच दिग्दर्शक आदित्य धर, निर्माता लोकेश धर आणि ज्योती किशोर देशपांडे यांचाही उल्लेख आहे.

4/7
याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरमध्ये बेनजीर भुट्टो यांचे फोटो आणि PPP शी संबंधित दृश्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता दाखवण्यात आली आहेत. यामुळे पाकिस्तानची प्रतिमा खराब होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कराचीतील लियारी परिसराला ‘दहशतवाद्यांचे युद्ध क्षेत्र’ म्हणून दाखवण्यात आले असून हे चित्रण अपमानास्पद, दिशाभूल करणारे आणि पाकिस्तानच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

5/7
मोहम्मद आमिर यांनी सांगितले की हा चित्रपट PPP, तिचे नेते आणि समर्थकांविरोधात द्वेष पसरवणारा आहे. त्यांनी पाकिस्तान दंड संहितेतील मानहानी, दंगलीला चिथावणी देणे आणि समाजात तेढ निर्माण करणे या कलमांचा हवाला दिला आहे. याचिकाकर्त्याने आधी पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

6/7
दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटाला भारतासह काही देशांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशांमध्ये या चित्रपटाला प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. या देशांतील सेन्सॉर मंडळांनी चित्रपट ‘पाकिस्तानविरोधी’ असल्याचा दावा करत तो नाकारला आहे.

7/7
याआधीही पाकिस्तानशी संबंधित कथानक असलेल्या काही भारतीय चित्रपटांना अशाच अडचणींचा सामना करावा लागला आहे. 2024 मध्ये ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘फायटर’ चित्रपटालाही खाडी देशांमध्ये बंदीचा सामना करावा लागला होता. तसेच याच वर्षी अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ आणि जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ हे चित्रपटही पाकिस्तानशी संबंधित आशयामुळे काही मध्य पूर्व देशांमध्ये प्रदर्शित होऊ शकले नव्हते.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement