8 एपिसोडची ही सीरिज OTT वर आहे ट्रेडिंग, काश्मीरची एक नवी बाजू दाखवणारी रिअल स्टोरी, विकेंडला पाहाच
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Web Series : ओटीटीवरील एक 8 एपिसोडची वेबसीरिज सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत आहे. वेगळा विषय, वेगळा जॉनर ओटीटी प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.
OTT वर प्रत्येक आठवड्याला नव्या सीरिज आणि फिल्म सीरिज होत असतात. वेगवेगळ्या वयोगटासाठी असणाऱ्या, वेगवेगळ्या जॉनरच्या या फिल्म आणि सीरिज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. ओटीटीवर नुकतीच सीरिज झालेली एक 8 एपिसोडची वेबसीरिज मात्र सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत आहे. वेगळा विषय, वेगळा जॉनर प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.
advertisement
advertisement
advertisement
‘रियल कश्मीर फुटबॉल क्लब’ची कथा 2014 मधील भीषण पुरानंतर दोन वर्षांनी, म्हणजेच 2016 मध्ये सुरू होते. त्या काळात काश्मीरमधील तरुण रोजगारासाठी वणवण भटकत होते आणि स्थानिक नेते त्यांचा वापर आंदोलनं आणि दगडफेकीसाठी करत होते. अशा परिस्थितीत पत्रकार पेशातील सोहेल मीर (मोहम्मद झीशान अय्युब) काश्मीरचा स्वतःचा फुटबॉल क्लब सुरू करण्याचं स्वप्न पाहतो. या प्रवासात त्याला साथ मिळते कश्मीरी पंडित उद्योजक शिरीष केमू (मानव कौल) यांची. लहानपणी झालेलं स्थलांतर आणि भावाच्या मृत्यूचं दुःख सोसलेला शिरीष काश्मीरमधील तरुणांसाठी एक चांगला मार्ग उघडू इच्छितो. आता ही जिद्दी जोडी एका भंगाराच्या मैदानापासून काश्मीरच्या पहिल्या फुटबॉल क्लबची पायाभरणी कशी करते? दिशाहीन, बेरोजगार आणि आपली स्वप्नं मनातच दडपून जगणाऱ्या तरुणांसोबत संघ उभा करून राष्ट्रीय लीगपर्यंतचा प्रवास कसा घडतो? हे सगळं जाणून घेण्यासाठी ही सीरिज पाहावी लागेल.
advertisement
advertisement
फुटबॉल क्लबच्या निमित्ताने काश्मीरमधील तरुणांची दिशा आणि उद्देश शोधण्याची धडपड 'रिअल कश्मीर फुटबॉल कल्ब' या सीरिजमध्ये साध्या आणि वास्तववादी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. मात्र, पटकथेत संघर्षाची तीव्रता जाणवत नाही. त्यामुळे एका स्पोर्ट्स ड्रामाकडून अपेक्षित असलेला जोश आणि भावनिक उंची निर्माण होत नाही. ठसठशीत प्रसंग आणि प्रभावी संवादांची कमतरताही खटकते. लेखक-दिग्दर्शक जोडी राजेश मापुस्कर आणि महेश मथाई यांनी सीरिज अधिकाधिक वास्तववादी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण कश्मीरी संस्कृतीचे रंग पुरेसे खुलवता आलेले नाहीत.
advertisement
'रिअल कश्मीर फुटबॉल क्लब' या सीरिजमध्ये मोहम्मद जीशान अय्यूब, मानव कौल, अभिशांत राणा, मुअज्जम भट, अनमोल ढिल्लन ठकेरिया, प्रिया चौहान, विशाखा सिंह, मार्क बेनिंगटन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रत्येक कलाकाराचा अभिनय प्रेक्षकांची मन जिंकतो. काश्मीरचा एक नवा, आशादायी चेहरा दाखवणारी ही प्रेरणादायी कथा एकदा नक्कीच पाहण्यासारखी आहे. सोनी लिव (Sony Liv) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.







