5 हजार वर्षांच्या इतिहासाचा प्रवास अनुभवता येणार, मुंबईत प्रथमच जागतिक पातळीवरील स्टडी गॅलरी सुरू, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
सुमारे 5000 वर्षांपूर्वीचा प्राचीन जगाचा परस्परसंबंध व्यापार, लेखन, धर्म, कला आणि विचारांच्या देवाणघेवाणीमुळे कसा घडला, याची सखोल ओळख प्रेक्षकांना या दालनातून मिळणार आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS), मुंबई येथे ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट : अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अँड द एन्शंट वर्ल्ड’ हे नवीन दालन 12 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाले. भारतातील प्रेक्षकांसाठी प्रथमच जागतिक स्तरावर निवडलेली एक भव्य शैक्षणिक दालन मुंबईत खुले झाले आहे. सुमारे 5000 वर्षांपूर्वीचा प्राचीन जगाचा परस्परसंबंध व्यापार, लेखन, धर्म, कला आणि विचारांच्या देवाणघेवाणीमुळे कसा घडला, याची सखोल ओळख प्रेक्षकांना या दालनातून मिळणार आहे.
या ऐतिहासिक उपक्रमात भारत, इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस आणि चीन तसेच अविभाजित भारताच्या प्रांतांमधील संस्कृतींच्या कथा सांगणाऱ्या सुमारे 300 निवडक पुरातत्त्वीय वस्तूंचा समावेश आहे. सिंधू–सरस्वती (हडप्पा) संस्कृतीपासून सुरू होणाऱ्या या प्राचीन वारशाद्वारे भारतभरातील विद्यापीठे आणि शाळांना वस्तूंमधून इतिहास शिकवण्यास प्रोत्साहन देणे हा या दालनाचा मुख्य हेतू आहे.
advertisement
गेल्या चार वर्षांपासून राबविलेल्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नाला Getty च्या शेअरिंग कलेक्शन्स प्रोग्रॅमचे सहकार्य लाभले आहे. CSMVS आणि त्याचे दीर्घकालीन भागीदार ब्रिटिश म्युझियम, लंडन यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा हा परिणाम आहे. तसेच स्टॅटलिशे म्युजेअन सु बर्लिन, म्युझियम रिएटबर्ग (झुरिच), आणि प्रथमच बेनकी म्युझियम (अथेन्स), अल-सबाह कलेक्शन (कुवेत), तसेच इफोरेट ऑफ अँटिक्विटीज ऑफ द सिटी ऑफ अथेन्स यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
advertisement
या प्रकल्पास भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे समर्थन प्राप्त झाले असून, पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI), राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली, अलाहाबाद संग्रहालय प्रयागराज, महाराष्ट्र शासनाचे पुरातत्त्व व संग्रहालय विभाग, इंडियन म्युझियम कोलकाता, बिहार संग्रहालय पटना, शासन संग्रहालय मथुरा आणि राज्य संग्रहालय लखनौ या संस्थांच्या समृद्ध संग्रहातील बहुमूल्य प्राचीन वस्तूंचाही समावेश आहे.
भारत आणि जगातील 15 महत्त्वपूर्ण संग्रहालयांमधील 300 हून अधिक अप्रतिम पुरातत्त्वीय वस्तूंच्या माध्यमातून प्राचीन भारताची जगाशी असलेली सांस्कृतिक, व्यापारी आणि वैचारिक नाळ उलगडून दाखवणारा हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे.
advertisement
मानवजातीने एकमेकांसोबत कसे राहणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि ज्ञान आणि संस्कृतीची दीर्घकालीन परंपरा उभारणे शिकले याचा अद्वितीय प्रवास या दालनात पाहायला मिळेल. या कथा वेगळ्या असल्या, तरी त्या एकमेकांशी निगडित आणि सामायिक मानवी वारशाचा भाग आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 5:19 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
5 हजार वर्षांच्या इतिहासाचा प्रवास अनुभवता येणार, मुंबईत प्रथमच जागतिक पातळीवरील स्टडी गॅलरी सुरू, Video








