Titwala- Goveli Accident: टिटवाळ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला भरधाव कारने हवेत उडवलं, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
कल्याण नजीक असलेल्या टिटवाळ्यामध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. भरधाव पिकअपच्या धडकेत रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
कल्याण नजीक असलेल्या टिटवाळ्यामध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. टिटवाळ्यानजीक असलेल्या गोवेली रोडवर हा काळजाचा थरकाप उडवाणारा अपघात घडला आहे. भरधाव पिकअपच्या धडकेत रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. घडलेल्या घटनेमुळे गावकरी संताप व्यक्त करत आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओमध्ये हा अपघात नेमका कसा घडला? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
टिटवाळ्याच्या गोवेली रोडजवळील घोटसई फाट्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव पिकअप टेम्पोने महिलेला चिरडले. महिला घोटसई फाट्यावरून जात असताना महिलेला भरधाव पिकअप टेम्पोने चिरडले. घटनेचा सीसीटिव्ही सध्या तुफान व्हायरल होत आहे. सुरेखा खडांगळे असं या मृत महिलेचं नाव आहे. त्या टिटवाळ्याच्या रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा खंडागळे या रस्त्याने पायी जात असताना अचानक पाठी मागून वेगात आलेल्या पिकअप टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
टेम्पोने महिलेला धडक दिल्यानंतर, महिला रस्त्यावर पडली आणि तिच्या अंगावरून त्याच अतिवेगाने टेम्पो गेला. यावरून या अपघाताची भीषणता आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओमध्ये अपघाताची थरारक दृश्ये स्पष्टपणे दिसत आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पिकअप टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
advertisement
टिटवाळा- गोवेली रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. शिवाय, गावकऱ्यांनी या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने. स्थानिक गावकऱ्यांनी घोटसई फाट्यावर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी या रस्त्यावर तातडीने स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवावेत, तसेच वाहतूक पोलीसांनी नियंत्रण ठेवावे आणि वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गोवेली गावकऱ्यांच्या मागणीला केव्हा यश मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 13, 2025 4:12 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Titwala- Goveli Accident: टिटवाळ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला भरधाव कारने हवेत उडवलं, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल










