2026 Lucky Rashi: कुंभसह या 4 राशींना 2026 वर्ष छप्पर फाडके देणार; नशीब चमकण्याचे योग जुळलेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Horoscope 2026: नवीन वर्ष 2026 धन, करिअर आणि आर्थिक बळकटीसाठी अनेक राशींसाठी खूप चांगला काळ घेऊन येईल. ग्रहांची स्थिती या राशींच्या बाजूने असेल. त्यामुळे, या काळात तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलल्यास उत्पन्नात चांगली वाढ होईल. या वर्षी तुमचा व्यवसायही खूप चांगला चालेल. चला, जाणून घेऊया या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
नवीन वर्षात ग्रहांची स्थिती पाहता गुरू, शनि आणि राहू-केतूंचे संक्रमण जीवनात बदल घडवणारे ठरेल. गुरु प्रगती, शिक्षण व आर्थिक संधी वाढवेल, तर शनि शिस्त, मेहनत आणि जबाबदाऱ्या यावर भर देईल. राहू-केतू मानसिकता, नातेसंबंध आणि आध्यात्मिक विचारांमध्ये बदल घडवू शकतात. एकूणच हे वर्ष संयम, नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर प्रगती देणारे ठरण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
कन्या रास 2026: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, कन्या राशीच्या लोकांना या वर्षी अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. बढती मिळण्याचीही मोठी चिन्हं आहेत. विदेशाशी संबंधित कामांमधून चांगले पैसे कमवू शकाल. नवीन काम (काँट्रॅक्ट) मिळू शकतं. जमीन-जुमल्यातून फायदा होईल. व्यावसायिकांसाठी हे वर्ष मोठा बदल घडवून आणणारं ठरू शकतं.
advertisement
advertisement
कुंभ रास 2026: बऱ्याच काळापासून थांबलेली कामं पूर्ण होताना दिसतील. 2026 मध्ये कुंभ राशीच्या लोकांना मोठं यश मिळेल. बऱ्याच काळापासून अडकलेली कामं पूर्ण होतील. व्यवसायात चांगली वाढ (ग्रोथ) मिळेल. बचत मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात देखील करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)











