What is abv on alcohol : दारूच्या बाटलीवर दिलेले % ABV म्हणजे काय? ड्रिंक करण्याआधी हे जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
What is abv on alcohol : एका कोपऱ्यात लहान अक्षरात '% ABV' असे लिहिलेले असते. आपण सहसा याकडे दुर्लक्ष करतो. पण, दारू पिणाऱ्या प्रत्येकासाठी हे 'ABV' चे प्रमाण खूप महत्त्वाचे आहे.
वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे आणि आपण आता नवीन वर्षांत जाणार आहोत. पण त्यापूर्वी लोकांना एक गोष्ट एक्साइट करते ती म्हणजे डिसेंबरमधील पार्टी, थंडी आणि दारु. या महिन्यात दारुचा खप वाढतो. दररोज न पिणारे लोक देखील या वर्षाअखेरीच्या पार्टीमध्ये कॅज्युअल ड्रिंक करतातच, पण तुम्ही कधी दारुच्या बाटलीवर % ABV लिहलेलं पाहिलंय का? हे का आणि कशासाठी लिहिलीलं असतं माहितीय?
advertisement
अनेकदा त्यावर मोठेमोठे ब्रँड्सचे नाव आणि आकर्षक डिझाईन असते, पण त्यासोबतच एका कोपऱ्यात लहान अक्षरात '% ABV' असे लिहिलेले असते. आपण सहसा याकडे दुर्लक्ष करतो.पण, दारू पिणाऱ्या प्रत्येकासाठी हे 'ABV' चे प्रमाण खूप महत्त्वाचे आहे, कारण तेच ठरवते की तुम्ही पित असलेले पेय किती शक्तिशाली आणि नशेसाठी किती प्रभावी आहे.
advertisement
advertisement
ABV म्हणजे काय? What is ABV?ABV चा पूर्ण अर्थ आहे Alcohol By Volume. मराठीत याला 'प्रमाणानुसार अल्कोहोल' असे म्हणता येईल. ABV हे दर्शवते की पेय पदार्थाच्या एकूण प्रमाणामध्ये शुद्ध अल्कोहोल (Ethanol) चे प्रमाण किती टक्के आहे. उदाहरण जर एखाद्या बिअरच्या बाटलीवर 5% ABV असे लिहिले असेल, तर याचा अर्थ त्या बिअरच्या एकूण प्रमाणात 5% भाग शुद्ध अल्कोहोल आहे आणि उर्वरित 95% भाग पाणी, फ्लेवर्स आणि इतर घटक आहेत.
advertisement
advertisement
ABV तुमच्यासाठी का महत्त्वाचे आहे?तुमच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ABV चे प्रमाण समजून घेणे आवश्यक आहे. ABV चा आकडा जेवढा मोठा, तेवढे त्या पेयात अल्कोहोलचे प्रमाण जास्त. म्हणजेच, ते पेय अधिक शक्तिशाली आहे आणि कमी प्रमाणात प्यायले तरी जास्त लवकर नशा चढू शकते. बिअरचा ABV 4% असतो, तर व्हिस्कीचा ABV 40% असतो. याचा अर्थ, तुम्ही जेवढ्या प्रमाणात बिअर पिऊ शकता, त्याच्या 10 पट कमी प्रमाणात व्हिस्की पिणे आवश्यक आहे, कारण अल्कोहोलचे प्रमाण सारखे ठेवण्यासाठी व्हिस्कीची मात्रा खूप कमी ठेवावी लागते.
advertisement









