झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा! आईच्या डोळ्यात अश्रु,चेहऱ्यावर आनंद, जेलमध्ये पहिल्यांदा कैद्याच्या बाळाच बारस

Last Updated:

Prison Baby Naming In Central Jail : ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या बाळाचा पहिला नामकरण सोहळा पार पडला. जेलमधील या विशेष कार्यक्रमात कैद्यांच्या कुटुंबीयांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

inmate baby naming ceremony
inmate baby naming ceremony
ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या बाळाचा पहिला नामकरण सोहळा पार पडला. जेलमधील या विशेष कार्यक्रमात कैद्यांच्या कुटुंबीयांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. बाळाच्या भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि ह्या अनोख्या कार्यक्रमाने जेलमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कैद्यांच्या बाळाचा पहिला नामकरण सोहळा
advertisement
ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या सभागृहात हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि पोलिसांच्या उपस्थिती शुक्रवारी पार पडला. जिथे त्या दिवशी एक लहानसा बारशाचा कार्यक्रम केला या निमित्ताने एक पाळणा आणून तो फुलांनी सजवलेला होता. दरम्यान कारागृहातील एका कैद्यांच्या बाळाचे नामकरण झाले.
या कार्यक्रमात सुमारे शंभर महिला कैदी उपस्थित होत्या आणि त्यांनी हा कार्यक्रम आनंदाने आणि उत्साहाने पाहिला. ज्या प्रमाणात महाराष्ट्रातील नामकरण सोहळ्यात पारंपरिक गाणी गायली जातात त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करण्यात आला आणि पाळण्यातील बाळाच्या कानात आईने हळूच नाव म्हटले. कारागृहात पहिल्यांदा झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आणले आणि चेहऱ्यावर हास्यही आणले. खरं तर या सर्वांचे कारण म्हणजे पहिल्यादा कारागृहात झालेला नामकरण सोहळा.
advertisement
ठाणे मध्यवर्ती कारागृहात सध्या सुमारे 140 महिला न्यायालयीन कैद्यांना ठेवण्यात आले आहे जे एकूण 3,140 कैद्यांपैकी सुमारे 4% आहेत. सहा वर्षांपर्यंतची मुले त्यांच्या आईसोबत राहू शकतात. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील कारागृह प्रशासनाने महिला कैद्यांच्या मुलांसाठी आणि कारागृह कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी डे-केअर केंद्र स्थापन करण्याची कल्पना मांडली. नन्हे कदम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रांमध्ये मुलांना शिक्षणाची संधी आणि कारागृहाच्या भिंतींपलीकडे बाहेर जगण्याचा अनुभव दिला जातो.
advertisement
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आईला बाळाची काळजी घेण्याचे तंत्र शिकवले गेले. नामकरणानंतर बाळासाठी कपडे, शँपू, तेल, कपडे आणि टॉवेल्स असलेला हॅम्पर दिला गेला. जेल सुपरिंटेंडेंट राणी भोसले यांनी सांगितले की ही फक्त एकमेव उपक्रम नाही, तर कैद्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांपैकी एक आहे. या कारागृहात बेकिंग, टेलरिंग, एम्ब्रॉइडरी, दागिने बनविणे, केसांची काळजी घेणे, कथक, गायन यासारख्या कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते, ज्यामुळे महिला रिलीझनंतर स्वावलंबी होऊ शकतील.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा! आईच्या डोळ्यात अश्रु,चेहऱ्यावर आनंद, जेलमध्ये पहिल्यांदा कैद्याच्या बाळाच बारस
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement