सहावीत शिकणाऱ्या मुलीची 19 व्या मजल्यावरून उडी, ठाण्यातील खळबळजनक घटना!

Last Updated:

ठाणे जिल्ह्याच्या कल्याण पश्चिम परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका सहावीत शिकणाऱ्या मुलीने इमारतीच्या 19 व्या मजल्यावरून उडी मारली आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
ठाणे जिल्ह्याच्या कल्याण पश्चिम परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका सहावीत शिकणाऱ्या मुलीने इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून उडी मारली आहे. या दुर्घटनेत तिचा करुण अंत झाला आहे. मागील काही काळापासून पीडित मुलगी अभ्यासामुळे तणावाखाली होती, याच तणावातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे.

नेमकी घटना काय घडली?

या घटनेची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, मुलगी १४ वर्षांची होती. ती कल्याण पश्चिममध्ये आपली आई, आजी आणि बहिणीसोबत राहत होती. नियमित अभ्यास करूनही गुणांमध्ये सुधारणा होत नसल्याने ती प्रचंड तणावाखाली होती, असं प्राथमिक तपासातून दिसून आल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अलीकडे दिवाळीपूर्वी झालेल्या परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे शिक्षकांनी सातत्याने तिला अभ्यासात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे तिची चिंता वाढली होती, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
advertisement

19 व्या मजल्यावरून मारली उडी?

घटनेच्या दिवशी तिने आपल्या राहत्या फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारली. ती पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर पडली. ही घटना घडताच आसपासच्या लोकांनी तातडीने या मुलीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण १९ व्या मजल्यावरून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement

नागपुरात बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या

दुसरीकडे, नागपूरमध्ये देखील एम्समध्ये शिकणाऱ्या एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं आहे. तिने राहत्या फ्लॅटमध्ये सिलिंग फॅनला ओढणीने बांधून गळफास घेतला. समृद्धी कृष्णकांत पांडे असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची कन्या होती. ती अभ्यासात प्रचंड हुशार होती. तरीही तिने आत्महत्या का केली? या प्रश्नाने मृत्यूचं गूढ वाढलं आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
सहावीत शिकणाऱ्या मुलीची 19 व्या मजल्यावरून उडी, ठाण्यातील खळबळजनक घटना!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement