आज सोमवती अमावस्या! 'या' छोट्या चुका टाळाच, अन्यथा होईल मोठं नुकसान; सोसावे लागतील हाल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज, 16 फेब्रुवारी 2026, सोमवार रोजी यंदाच्या वर्षातील पहिली 'सोमवती अमावस्या' साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानंतर लगेचच आलेली ही अमावस्या आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
Somvati Amavasya Mistakes : आज, 16 फेब्रुवारी 2026, सोमवार रोजी यंदाच्या वर्षातील पहिली 'सोमवती अमावस्या' साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानंतर लगेचच आलेली ही अमावस्या आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला 'सोमवती अमावस्या' म्हणतात, जी पितरांच्या आशीर्वादासाठी आणि वैवाहिक सुखासाठी वरदान ठरते. मात्र, शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या काही छोट्या चुका तुमच्या आयुष्यात मोठे संकट ओढवू शकतात. पितरांचा कोप आणि महादेवाची नाराजी टाळण्यासाठी उद्या खालील चुका टाळणे अनिवार्य आहे.
सोमवती अमावस्येला 'या' चुका टाळाच
तुळशीचे पान तोडणे किंवा पाणी घालणे
अनेक लोक भक्तिभावाने अमावस्येला तुळशीची पूजा करतात. मात्र, सोमवती अमावस्येला तुळशीचे पान तोडणे सक्त मनाई आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास तुळशीमध्ये असतो. तसेच, विनाकारण तुळशीला स्पर्श करणे किंवा जास्त पाणी घालणे या दिवशी अशुभ मानले जाते. यामुळे घरातील समृद्धी कमी होऊ शकते.
advertisement
तामसिक भोजन आणि मद्यपान
अमावस्या ही चंद्राची क्षीण स्थिती असते, ज्याचा थेट परिणाम मानवी मनावर होतो. या दिवशी कांदा, लसूण, मांस किंवा मद्यपान केल्याने मनातील नकारात्मकता वाढते. तामसिक अन्नामुळे पितृदोष बळावतो, ज्यामुळे कुटुंबात विनाकारण वाद आणि पैशांची चणचण निर्माण होते.
उशिरापर्यंत झोपणे किंवा वाद करणे
सोमवती अमावस्येला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे महत्त्वाचे असते. जो व्यक्ती या दिवशी उशिरापर्यंत झोपतो, त्याच्या कुंडलीतील चंद्र आणि शनी खराब होतात. तसेच, या दिवशी कोणाशीही भांडण, वाद किंवा कोणाचा अपमान करू नका. विशेषतः घरातील स्त्री किंवा वडिलांचा अपमान केल्यास पितर संतप्त होतात.
advertisement
पिंपळाचे झाड तोडणे किंवा स्पर्श करणे
सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी चुकूनही पिंपळाची फांदी तोडू नका किंवा झाडाला हानी पोहोचवू नका. शनिवार सोडून इतर दिवशी सूर्यास्तापूर्वी पिंपळाला स्पर्श करणे टाळावे; केवळ प्रदक्षिणा घालून पूजा करावी.
रात्रीच्या वेळी 'या' ठिकाणी जाऊ नका
सोमवती अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशानभूमी, निर्जन रस्ते किंवा नदीकाठी एकटे जाणे टाळावे. लहान मुले आणि गरोदर स्त्रियांनी या दिवशी बाहेर पडताना काळजी घ्यावी.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 6:46 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
आज सोमवती अमावस्या! 'या' छोट्या चुका टाळाच, अन्यथा होईल मोठं नुकसान; सोसावे लागतील हाल






