advertisement

Diva Crime : लाडक्या जावयाचं शैतानी कांड! रात्र असताना पत्नी अन् सासूसोबत..., परिसर हादरला

Last Updated:

Diva Shocking Crime : दिवा शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आणि या प्रकरणी घरातील जावया विरोद्धात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दिवा पूर्व परिसरात कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूवर लोखंडी तव्याने हल्ला;
दिवा पूर्व परिसरात कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूवर लोखंडी तव्याने हल्ला;
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील दिवा पूर्व भागात कौटुंबिक वादातून मारहाणीची गंभीर घटना घडली आहे. पतीने रागाच्या भरात पत्नी आणि सासूवर लोखंडी तव्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पत्नीच्या पायाला तर सासूच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ज्याला लाडकं मानलं त्यानेच घात केला
मिळालेल्या माहितीनुसार घरातील किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात स्वयंपाकघरातील लोखंडी तवा हातात घेत पत्नीवर हल्ला केला. हा प्रकार पाहून मध्ये पडलेल्या सासूवरही त्याने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी सासूने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मुंब्रा पोलिस ठाणे येथे आरोपी जावयाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या घटनेमुळे दिवा परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. कौटुंबिक वादातून हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Diva Crime : लाडक्या जावयाचं शैतानी कांड! रात्र असताना पत्नी अन् सासूसोबत..., परिसर हादरला
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement