Thane : ज्या मैत्रिणीचं नाव सांगितलं तिथं ती पोहचलीच नाही; तासनतास उलटल्यावर समोर आलं भयंकर सत्य
Last Updated:
Missing Girl News : मैत्रिणीकडे जाते सांगून गेलेली 16 वर्षीय कृष्णा यादव बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
ठाणे : ठाणे शहरातील एका परिसरात राहणारी 16 वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ती मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ उलटून गेला तरी ती घरी परतली नाही.
मैत्रिणीकडे गेलेल्या तरुणीसोबत नेमकं घडलं काय?
चिमुकली घरातून बाहेर पडल्यानंतर कुटुंबीयांनी तिची वाट पाहिली. रात्री उशीर झाला तरी ती न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यानंतर नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती आणि परिसरात तिचा शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही तिचा थांगपत्ता लागला नाही.
तक्रारीत अपहरणाचा संशय
शोध घेऊनही मुलगी सापडत नसल्याने तिची आई माया यादव यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला आहे.
advertisement
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, मुलीच्या मैत्रिणी, ओळखीच्या व्यक्ती आणि नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. तसेच तिचा मोबाईल फोन, शेवटचे लोकेशन आणि हालचालींचा तपासही सुरू आहे.
अल्पवयीन मुलगी असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून लवकरात लवकर मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ शांतीनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 11:42 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : ज्या मैत्रिणीचं नाव सांगितलं तिथं ती पोहचलीच नाही; तासनतास उलटल्यावर समोर आलं भयंकर सत्य









