advertisement

नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! NMMT च्या ताफ्यात 150 खास बस, थेट मुंबई, ठाणे, पनवेलपर्यंत धावणार

Last Updated:

Navi Mumbai News: नवी मुंबई परिवहनच्या वतीने नवी मुंबईबरोबरच, मुंबई, ठाणे, पनवेल, उरण आणि अगदी खोपोलीपर्यंत सेवा दिली जाते.

नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! NMMT च्या ताफ्यात 150 खास बस, थेट मुंबई, ठाणे, पनवेलपर्यंत धावणार
नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! NMMT च्या ताफ्यात 150 खास बस, थेट मुंबई, ठाणे, पनवेलपर्यंत धावणार
नवी मुंबई: नवी मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि आरामदायी होणार आहे. मार्च महिनाअखेर नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) ताफ्यात 150 नव्या बस दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे या बस सीएनजीवर धावतील. त्यामुळे परिवहन सेवेमधील बसगाड्यांची अडचण दूर होणार आहे. शहरात पर्यावरणपूरक बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी सीएनजी बस खरेदी करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सध्या 500 बस आहेत. यातील 400 ते 425 बस या रस्त्यावर उतरून रोज प्रवाशांना सेवा देतात. मात्र, प्रवाशांची गर्दी विचारात घेता या बस अपुऱ्या पडत आहेत. शहरातील प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेता परिवहन उपक्रमाला आणखी 400 बसची गरज आहे. मात्र, बसच उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
advertisement
प्रवाशांची गरज लक्षात घेऊन वर्षभरापूर्वी परिवहन उपक्रमात 150 सीएनजी बस खरेदीचा निर्णय झाला होता. या बस टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यात येणार होत्या. आता मार्च अखेरीपासून एनएमएमटीच्या ताफ्यात बस दाखल होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवास सोपा होणार आहे.
advertisement
दरम्यान, एनएमएमटीच्या वतीने नवी मुंबईबरोबरच, मुंबई, ठाणे, पनवेल, उरण आणि अगदी खोपोलीपर्यंत सेवा दिली जाते. त्यासाठी परिवहनच्या ताफ्यात अधिक बसगाड्यांची आवश्यकता आहे. सध्या सीएनजीबरोबरच बॅटरीवर धावणाऱ्या वातानुकूलित बस देखील वापरात आहेत. मात्र, नवी मुंबई परिवहन उपक्रमाने सीएनजी बस खरेदीलाच प्राधान्य दिले आहे.
इलेक्ट्रिकऐवजी सीएनजी बसला पसंती
गेल्या काही काळात एनएमएमटीने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस खरेदीला प्राधान्य दिले होते. त्यानुसार परिवहन उपक्रमात 100 हून अधिक इलेक्ट्रिक बस सेवा देत आहेत. परंतु, बऱ्याचदा इलेक्ट्रिक बस चार्जिंगअभावी रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. सततची समस्या टाळण्यासाठी एनएमएमटीने इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजीवर धावणाऱ्या बसकडे मोर्चा वळवला आहे. या मार्च महिनाअखेर सीएनजी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होतील, असे परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! NMMT च्या ताफ्यात 150 खास बस, थेट मुंबई, ठाणे, पनवेलपर्यंत धावणार
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement