Thane: कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
- Reported by:AJIT MANDHARE
- Published by:Sachin S
Last Updated:
ठाण्याच्या शिवसेनेच्या माजी महापौर तथा शिवसेना महिला जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे यांची एक ॲाडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
ठाणे : राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. प्रचार सभेतून आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू आहे. अशातच ठाण्यााच्या माजी महापौर आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिनाक्षी शिंदे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मिनाक्षी शिंदे यांनी एका व्यक्तीला घरात घुसून मारेन, असं म्हणत शिवीगाळ केली असल्याचं सांगितलं जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपवर अखेरीस मिनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
ठाण्याच्या शिवसेनेच्या माजी महापौर तथा शिवसेना महिला जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे यांची एक ॲाडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपची न्यूज१८ लोकमतने पुष्टी केलेली नाही. मात्र, ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
अखेरीस, या प्रकरणावर मिनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "या क्लिप मधील आवाज माझा आहे का? याबाबत मी आताच स्पष्टीकरण देणार नाही. कारण, मी याबाबत तक्रार केली आहे. पण या क्लिपमध्ये आगरी समाजाला माझ्या विरोधात भडकवलं जातंय आणि लवकरच आणखी दोन ॲाडिओ क्लिप AI चा वापर करुन व्हायरल केल्या जाणार आहेत, असं मिनाक्षी शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच, या क्लिपमध्ये अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या बद्दल जे वक्तव्य करण्यात आलंय आणि ही क्लिप भूषण भोईर यांनीच म्हणजे विरोधकांनी केलीये, असा आरोपही मिनाक्षी शिंदे यांनी केला होता.
advertisement
काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये?
view commentsया क्लिपमध्ये अत्यंत अर्वाच्च भाषेत शिविगाळ या ॲाडिओ क्लिपमध्ये केली असून बायका पाठवून घरात घुसून मारेन, माणसं पाठवेन, पोलीस कमिश्नरला सांगून काय काय करेल, अशा अनेक धमक्या मिनाक्षी शिंदे यांनी फोनवर दिल्या आहेत. तसंच, पांडू नावाची एक व्यक्ती आहे त्या व्यक्ती बद्दल बोलताना मिनाक्षी शिंदे यांनी ही शिवीगाळ केली आहे. सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी मिनाक्षी शिंदे संबंधीत व्यक्तीला बोलत असताना विरोधी उमेदवार भूषण भोईर यांच्या बाबत देखील त्यांनी वक्तव्य केलं आहेत.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 5:03 PM IST









