कष्ट, कला आणि जिद्द! जालंदर लोकरेंची Success Story प्रत्येकासाठी ठरली आदर्श

Last Updated:

जन्मापासून दारिद्र्य वाट्याला आलेल्या जालंदर लोकरे यांनी वयाच्या साठीमध्येही एका पंचवीशीतल्या तरूणाला मागे टाकले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या व्यवसायात त्यांनी वयाच्या साठीमध्ये, हार मानली नाही.

+
जालंदर

जालंदर लोकरे बॅग कारागीर

जन्मापासून दारिद्र्य वाट्याला आलेल्या जालंदर लोकरे यांनी वयाच्या साठीमध्येही एका पंचवीशीतल्या तरूणाला मागे टाकले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या व्यवसायात त्यांनी वयाच्या साठीमध्ये, हार मानली नाही. राहायला घर नाही की दार. वडील धनगर असल्याने मेंढी पालन व्यवसाय करत त्यामुळे ते कुठेही जंगलात राहून दिवस लोटायचे. परंतु लोकरे जिद्दी आणि धाडसी ज्या वयात मुले शाळेत जातात त्याच वयात लोकरे त्या शाळेच्या बाहेर राहून चणे विकायचे.
मुलं शाळेच्या बाहेर चणे विकताना त्यांना व्यवसायाची आवड निर्माण झाली, म्हणून मोकळ्या वेळेत कचऱ्यात पडलेल्या बॅग आणि कपडे घरी आणायचे त्यांना धुवून व्यवस्थित करून खोलायचे चैन तुटली असेल तर लावायचे वगैरे आणि सायन स्टेशनवर नेऊन ते विकायचे. 1980 पासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. परंतु मेहनतीने 15रु. मिळत असतील तर उपयोग नाही. म्हणून त्याच परिस्थितीत ते स्वतःच शिकले वेगवेगळ्या बॅग बनवायला. कुठे क्लास लावायला पैशाची कमतरता म्हणून पुढे पाऊल टाकायला मागे पर्याय शिल्लक नव्हता.
advertisement
त्यामुळे लोकरे यांनी वयाच्या 8 वर्षापासून चणे विकण्यापासून आज चांगले कारागीर होईपर्यंत पर्यंत कष्ट केले. लोकरे यांची एकवेळ अशी होती की राहायला घर नाही म्हणून वडिलांनी जंगलात राहून दिवस काढले तर जालंदर यांनी काम करायचे तिथेच राहायचं असे दिवस काढले. आज ही परिस्थिती बदलत त्यांनी मुंबई सारख्या शहरात स्वतःच घर आणि मुलांचं शिक्षण हे सर्व शून्यातून उभ केलं यांनी परिस्थिती माणसानं शिकवते. आई वडिलांचे एकुलेत एक लोकरे आज सोबत फक्त कला आणि त्या कलेच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.
advertisement
आज 45 ते 50 वर्षांत कल्याणमध्ये लोकरे बॅगवाले म्हणून त्याची ओळख आहे. आपण काढलेले दिवस पुढच्या पिढीला नको म्हणून केलेल्या कष्ट मेहनत ते शिकले नाही पण मुलांना शिकवलं. त्यांना राहायला घर नव्हतं पण मुलांना आज घर दिलं. आज ते वयाच्या साठीमध्ये सुधारक जल्लोषात बॅग बनवण्याचा काम करत आहेत. आज त्याच स्वतःच बॅग च दुकान आहे. एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला मागे टाकणाऱ्या जालंदर लोकरेंचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
कष्ट, कला आणि जिद्द! जालंदर लोकरेंची Success Story प्रत्येकासाठी ठरली आदर्श
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement