अमरावती: आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, काही लोकांसाठी फोन वाजणे, कॉल करणे किंवा कॉल उचलणे हीच एक मोठी मानसिक अडचण ठरत आहे. या समस्येला ‘टेलिफोबिया’ असे म्हटले जाते. फोन वापरण्याची भीती ही केवळ सवय नसून ती एक मानसिक समस्या ठरू शकते. तर ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवते? यावरील उपाय काय? याबाबत माहिती जाणून घेऊ.



