बीड : आरोग्य राखण्यासाठी लोक विविध उपाय अवलंबतात, परंतु सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय ही सर्वांत सोपी आणि परिणामकारक सवय मानली जाते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोन्ही या सवयीच्या फायद्यांवर सहमत आहेत. झोपेत शरीराची कार्यप्रणाली मंदावलेली असते, त्यामुळे सकाळी गरम पाणी पिण्याने शरीरातील पेशींना नवसंजीवनी मिळते. त्यामुळे शरीरातील अवशिष्ट पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि पचनसंस्था सक्रिय बनते.
Last Updated: November 03, 2025, 19:03 IST