बीड : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पुरुषांमध्ये सतत थकवा जाणवण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वी शारीरिक मेहनतीशी संबंधित असलेला थकवा आता मानसिक आणि जीवनशैलीशी जोडला गेला आहे. कामाचा वाढता ताण, स्पर्धा, आर्थिक जबाबदाऱ्या आणि वेळेचे दडपण यामुळे अनेक पुरुष दिवसभर दमलेले आणि उत्साहहीन वाटतात. बीड येथील सचिन थेटे या आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा थकवा केवळ विश्रांती अभावी नसून तो बदलत्या सवयी आणि आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा परिणाम आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 12:53 IST


