चंद्रपूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. चंद्रपूरमध्ये सध्या बांबू कापायचे काम सुरु आहे. त्यासाठी तेथे बालाघाटातून मजूर आले आहेत. त्यातील काही मजूर ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील महादवाडीच्या जंगलात काम करत होते. तेव्हा वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन मजूरांचा मृत्यु झाला आहे. प्रेम सिंग हुदे आणि बुधासिंग मढावी अशा मृत व्यक्तींची नावे आहेत.
Last Updated: Dec 28, 2025, 17:32 IST


