छत्रपती संभाजीनगर: पारंपारिक पिकांना मागे टाकत अनेक शेतकरी फळबागा आणि फुलशेतीकडे वळत आहे. याचप्रमाणे फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द गावातील उच्चशिक्षित तरुण शेतकरी भगवान सचिन पाटील हे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून फुल शेती करत आहे. 20 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केलेली आहे. सुपर ऑरेंज आणि अक्षदा येलो या झेंडू फुल शेतीच्या माध्यमातून गतवर्षी भगवान पाटील यांना 1.50 लाखांचं उत्पन्न मिळालं होतं, यंदा देखील दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.



