'स्टेटस' चित्रपटातील 'मस्त मगन' गाणं आहे. जे खूपच लोकप्रिय झाले होते. या चित्रपटात दोन वेगवेगळ्या राज्यातील तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. अर्जून कपूर पंजाबी तर आलिया तमिळ दाखवली आहे. विचार पटत नसल्याने या दोघांचे लग्न मोडण्यापर्यंत सगळं जातं. दोन्ही कुटुंबातील मतभेद कमी झाल्यावर, अखेरीस कृष आणि अनन्याचे तमिळ आणि पंजाबी अशा दोन्ही पद्धतीने थाटामाटात लग्न होते. हे गाणं अर्जित सिंग याने गायले आहे. चित्रपटात संस्कृती, भाषा आणि कुटुंबांमधील अंतर भरून काढून प्रेमाचा विजय कसा होतो, हे विनोदी आणि भावनिक पद्धतीने दाखवले आहे.



