Superhit Song : 'मेरे जीवन साथी' चित्रपटातील 'ओ मेरे दिल के चैन' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. या गाण्यात नायक आपल्या प्रेयसीला प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. चित्रपटात एका अमर कथेविषयी दाखवले आहे. खूपच मनाला भावनारी ही प्रेम कथा आहे. हा चित्रपट त्या काळातील सामाजिक आणि कौटूंबिक समस्यांवर मात करून प्रेमाचा विजय कसा होतो, हे दाखवतो. हे गाणं चक्क लोकप्रिय गायक किशोर कुमार यांनी गायले आहे. या गाण्याला संगीत आर.डी.बर्मन यांनी दिले आहे. तर गाण्याचे बोल हे मजरुह सुल्तानपुरी यांनी लिहिले आहे. या चित्रपटात राजेश खन्ना आणि अभिनेत्री तनुजा अशी दिग्गज कास्ट होती.



