Bollywood Song : संजय दत्त आणि माधूरीचा 'साजन' चित्रपट 1991 मध्ये आला होता. हा चित्रपट रोमँटिक जॉनरचा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे लॉरेन्स डी सूझा यांनी केले होते. त्यातील 'मेरा दिल भी कितना पागल है' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणं कुमार सानू आणि अल्का याग्निक यांनी गायले होते. तर त्याचे संगीत नदीम-श्रवण यांनी दिले होते. चित्रपटही हिट ठरला होता. हे गाणं प्रेमात पडलेल्या प्रेमी युगुलांना कायमच आवडते. या चित्रपटात एक लव ट्रँगल होता, जो अभिनेता सलमान खान, संजय दत्त आणि माधूरी दीक्षित यांच्या भोवती फिरत होता. या चित्रपटाची सर्वच गाणी सुपरहिट झाली होती.



